16.6 C
New York

Corona Update : देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं ? रुग्ण संख्या वाढली

Published:

देशातील अनेक राज्यात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या झपाट्याने (Corona Update) वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहेत. त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सरकारने ॲडव्हायजरी, सतर्कतेचा सल्ला दिला आहे. सर्व रुग्णालयांना सुद्धा अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. कोविडशी दोन हात करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाचे प्रकरण दिल्लीत तीन वर्षांनी समोर येत आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, हरियाणा, केरळ, कर्नाटक आणि इतर राज्यात कोविड-19 चे नवीन प्रकरण समोर येत आहेत.

Corona Update काल मुंबईत दिवसभरात 35 कोरोना रुग्ण

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत असून शुक्रवारी (23 मे) नवीन 45 रुग्णांची नोंद झाली. एकट्या मुंबईत यामध्ये सर्वाधिक 35 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 185 पर्यंत पोहोचली आहे. यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून त्यांनी विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली असून गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. मे महिन्यापासून मुंबई शहरात रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्व रुग्ण फ्ल्यू आणि सहव्याधी असलेले आहेत. पालिका प्रशासनाकडून नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 6,819 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 210 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात केवळ मुंबई विभागात एकूण 185 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 81 रुग्ण आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

Corona Update ठाण्यात कोरोनाचे १० रुग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी असे निर्देश दिले आहेत. तसेच, विशेष कक्ष कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तयार करण्यात आला आहे. सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत. कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे तयार करण्यात आले आहेत. कळवा येथे आरटीपीसीआरची सुविधाही उपलब्ध करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img