20.1 C
New York

Otur : ओतूरमध्ये दोन बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात

Published:

ओतूर (Otur) ,प्रतिनिधी:दि.८ मे ( रमेश ताबे )

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे दोन बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याची गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथक पुणे व ओतूर पोलिसांना मिळाली त्यानुसार दि.७ रोजी ओतूर येथील जुन्या बस स्थानकाजवळ दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.

मोहम्मद ताजमिर हुसेन मोहम्मद गुलाम मुस्तफा वय २८, राहणार बोईकारी, तालुका जिल्हा सातखिरा,आलिमून कादेर मोहम्मद गुलाम हुसेन वय २७, राहणार बोईकारी, तालुका जिल्हा सातखिरा अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे असून, हे दोघेही नाव बदलून भारतामध्ये वास्तव्यास होते त्यांच्यावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे श्री थाटे यांनी सांगीतले.

याबाबत अधिक माहिती देताना श्री थाटे म्हणाले की,ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत ओतूर शहरात दोन बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्यास असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेली असल्यामुळे दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस हवालदार शरद जाधव, ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक आमने, पोलीस हवालदार दिनेश साबळे, नामदेव बांबळे, महेश पठारे, पालवे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित बोंबले, संतोष भोसले, किशोर बर्डे, ज्योतीराम पवार, विशाल गोडसे यांनी दि.७ रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास ओतूर जुन्या बस स्टँड जवळून सदर दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांना ओतूर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तसेच त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे व भारतात घुसखोरी करून बेकादेशीररित्या राहत असल्याचे निष्पन्न झाले. सदर दोन बांगलादेशी नागरिकांकडे त्यांचे बांगलादेशी पासपोर्ट तसेच भारतातील आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळून आली आहेत.

    सदर बाबत ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित बोंबले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर दोन बांगलादेशी नागरिकांवर परकीय नागरिक कायदा १९४६ कलम १४ पारपत्र अधिनियम १९६७ नियम ३ व ६, परकीय नागरिक आदेश १९५० चे कलम ३ (अ) अन्वये  गुन्हा दाखल झाला आहे. सदर दोन बांगलादेशी नागरिकांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून दि. ८ मे रोजी मा.न्यायालयापुढे रिमांड कामी हजर करणार आहे. 

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे हे करीत आहेत.

     सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img