25.2 C
New York

Crime News : तिहेरी हत्याकांडातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; बहीणीचा दिरच निघाला खुनी  

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.८ जून ( रमेश तांबे )

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती गावचे हद्दीत पुणे-नगर हायवे (Crime News) लगत, बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे रोडचे बाजूला काही अंतरावर एक अनोळखी महिला व दोन लहान मुलांचा मृतदेह दि.२५ मे रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने  खळबळ उडाली होती.

दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी या हत्याकांडाचा अठरा दिवसातच तपास पुर्ण करून,खून झालेली महिला व दोन मुलांची ओळख पटवून,या तिहेरी हत्याकांडातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

स्वाती केशव सोनवणे वय २५ वर्षे, स्वराज केशव सोनवणे वय २ वर्षे, व विराज केशव सोनवणे १ वर्षे, सर्व राहणार वाघोरा, ता माजलगाव जि.बीड अशी खून झालेल्या तिघांची नावे आहेत.

याप्रकरणी गोरख पोपट बोखारे वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी गोरख बोखारे व मृत स्वाती सोनवणे यांचेत प्रेमसंबंध होते.

त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे यास लग्न करण्याची मागणी करत होती.मृत स्वाती हिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून आरोपी गोरख बोखारे याने खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला  पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

दि.२५ मे रोजी रांजणगाव एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन गावचे हद्दीत पुणे-नगर हायवे लगत, बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे रोडचे बाजूला काही अंतरावर एक महिला, दोन लहान मुले असे एकूण तीन मृतदेह पोलीसांना आढळून आले होते. सदरचे मृतदेह हे मृत अवस्थेत व अर्ध जळालेले असल्याने मृतदेहांची ओळख पटवून खुन्याला पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते

याबाबत पुणे जिल्हा ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी त्यांचे कौशल्य वापरून पुणे ग्रामीण जिल्हयातील ३३ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येकी एक अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अंमलदार यांची पाच दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात बैठक घेवून त्यांनी सर्व अंमलदारांना सूचना करत, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे अखात्यारीत एकूण २८ अंमलदारांची ६ तपास पथके तयार करून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रवाना केली होती.

मृतदेहातील महिलेचे हातावर असलेले गोंदण ( टॅटू ) चे आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध लावण्याकरीता तपास

पथकांमार्फत पुणे नगर हायवे रोडवरील सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज वाघोली ते राहुरी पर्यंत चेक करण्यात आले. सुमारे १६५०० भाडेकरू तपासण्यात आले, चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव एम.आय.डी.सी. तील कामगारांकडे तपास केला गेला,

सर्व तपास पथकामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात जावून मानव मिसींगची माहिती घेवून पडताळणी करण्यात आली.बीड जिल्ह्यात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दि.९ मे रोजी एक महिला मिसींग असलेबाबत नोंद आढळून आली. सदर महिला ही मृत महिलेच्या वर्णनाची असल्याने त्याबाबत सखोल तपास करणेत आला,मृत महिला व मिसींग महिला ही एकच असल्याची खात्री झालेनंतर मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे  असे असल्याचे निष्पन्न झाले. तिचा पती नामे केशव सोनवणे याचेकडे चौकशी केली असता, स्वाती सोनवणे ही तिचे दोन मुलांसह आळंदी येथे तिचे आई वडीलांकडे गेली होती.

आरोपी गोरख बोखारे याचे भावाला मृत स्वाती सोनवणे हिची बहीण दिलेली असून मृत स्वाती ही आरोपीचे चुलत मामाची मुलगी असल्याने ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. मृत स्वाती व तिचा नवऱ्यामध्ये नेहमी भांडण होत होत, त्यामुळे आरोपी गोरख बोखारे हा त्यांचेतील वाद मिटवत असे त्यादरम्यान आरोपी गोरख बोखारे व मृत स्वाती सोनवणे यांचेत प्रेमसंबंध तयार झाले होते. त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे यास लग्न करण्याची मागणी करत होती.

दि.२३ मे रोजी स्वाती व तिची दोन्ही मुले स्वराज वय २ वर्षे, व विराज १ वर्षे यांचेसह स्वातीचे बहीणीचा दिर आरोपी गोरख पोपट बोखारे याने त्याचेकडील मोटार सायकलवर मृत स्वाती सोनवणे व तिची दोन्ही मुले यांना आळंदी येथून घेवून सरदवाडी शिरूर येथे जात असताना रात्रीचे वेळी रांजणगाव गणपती गावचे हद्दीतील पुणे-नगर हायवेरोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे कच्या रोडलगत मोटार सायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.पुणे ग्रामीण पोलीसांनी गोरख पोपट बोखारे यास ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.

आरोपी गोरख बोखारे यास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून त्यास मा न्यायालयात हजर  केले असता त्यास दि.११ जून पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले,दौडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पो स्टे चे पो नि महादेव वाघमोडे, पुणे ग्रा.चे पोनि विश्वास जाधव, स्थागुशा चे स.पो.नि.दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव पो स्टे चे निळकंठ तिडके, पोसइ अविनाश थोरात, मपोसई सविता काळे, शिक्रापूर पो स्टे चे पोसई महेश डोंगरे स्थागुशा चे दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पो स्टे चे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पो स्टे चे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पो स्टे कडील विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्हयात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ, यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img