21.7 C
New York

 Sanjay Raut : “मोदी-शहांपासून महाराष्ट्राला धोका, त्यांना महाराष्ट्र..” संजय राऊतांचा घणाघात

Published:

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या दोघांचेही राज्यातील दौरे वाढले आहेत. काल अमित शाह (Amit Shah) मुंबईत होते. त्याआधी मागील आठवड्यात दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनीही राज्यासाठी अनेक विकासकामांचे लोकार्पण केले.

सरकारच्या या कामांवर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. निवडणुका आल्यात म्हणून केली जात असल्याची टीका त्यांच्याकडून केली जात आहे. आणखी एक पाऊल पुढे टाकत संजय राऊत यांनी तर पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रासाठी धोका असल्याचे सांगून टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांपासून महाराष्ट्राला खरा धोका आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आज माध्यमांशी संवाद साधत संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाजप आणि केंद्रातील एनडीए सरकारला घेरलं. राऊत पुढे म्हणाले, खरं म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहापासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राची लूट होत आहे. ह्यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे. मराठी माणूस खतम करायचा आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान खोडून काढायचा आहे. महाराष्ट्राचा उरलासुरला स्वाभिमान मोडून काढायचा आहे. महाराष्ट्राला गुजरातला जोडायचे आहे म्हणून हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत.

पुन्हा संजय राऊत यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं, म्हणाले

महाराष्ट्राची इंच इंच जमीन महाराष्ट्राच्या संस्था आणि उद्योग अदानींच्या घशात घातले जात आहेत. ही संपत्ती जरी अदानींच्या नावावर असली तरी या दौलतीचे मालक नरेंद्र मोदी आणि शहा आहेत. संजय राऊत यांनी यावेळी महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहेत असा इशारादिला.

 Sanjay Raut भाजपाचे अधःपतन सुरू

अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे. 2024 ला पूर्णपणे सरकार आणू शकले नाही त्यामुळे संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार झाला आहे. संपूर्ण देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत आणि ते गल्लोगल्ली महाराष्ट्रात फिरत आहेत हे त्यांना शोभत नाही. 2029 मध्ये आपली सरकार राहणार की नाही हा त्यांनी विचार करावा. नरेंद्र मोदींना त्यांच्या नियमानुसार ७५ वर्षांनुसार निवृत्त व्हायला लागणार आहे. 2024 ला तुम्ही 240 ला थांबलेले आहात 2029 ला आपण 140 च्या खाली थांबाल. या देशातून भारतीय जनता पक्षाचे अधःपतन सुरू झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img