उन्हाळ्यात सूर्याची तीव्रता, घाम, धूळ आणि चिकटपणामुळे आपल्या त्वचेवर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय वापरत असतो. अशाच उपायांपैकी एक म्हणजे – फ्रिजमधील थंड पाण्याने चेहरा धुणे. अनेकजण या सवयीला फक्त ताजेपणा देणारा उपाय म्हणून घेतात, परंतु याचे फायदे केवळ ताजेपणापुरते मर्यादित नाहीत.
- त्वचेचा थकवा आणि उष्णता दूर होते
घराबाहेरून येताना चेहरा सूर्यप्रकाशामुळे तापतो. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला तात्काळ थंडावा मिळतो. यामुळे त्वचा शांत होते आणि चेहऱ्यावरचा थकवा क्षणात दूर होतो.
- तेलकटपणा नियंत्रणात राहतो
उन्हाळ्यात तेलग्रंथ्या जास्त ऍक्टिव्ह होतात, त्यामुळे चेहरा सतत चिकट वाटतो. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेमधील तेलाचे प्रमाण संतुलित राहते, जे मुरुमांची शक्यता कमी करते.
- छिद्रं (पोर्स) घट्ट होतात
थंड पाणी त्वचेवरील उघडे पोर्स घट्ट करते. त्यामुळे धूळ, प्रदूषण आणि मेकअपचे कण त्वचेत खोलवर जाण्यापासून अटकाव होतो. परिणामी त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते.
- सूज आणि लालसरपणावर आराम
उन्हाळ्यात विशेषतः डोळ्यांभोवती सूज येते. थंड पाण्याचा स्पर्श रक्ताभिसरण सुधारतो आणि सूज कमी करण्यास मदत करतो. फेस रोलर किंवा आइस क्यूब वापरणे देखील यासाठी प्रभावी ठरते.
- मेकअप टिकवतो जास्त वेळ
थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा गुळगुळीत होते. परिणामी, मेकअप अधिक चांगल्या प्रकारे बसतो आणि दीर्घकाळ टिकतो.
- त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकतो
कोणतेही महागडे प्रॉडक्ट न वापरता फक्त थंड पाण्याच्या वापराने त्वचा ताजी, निरोगी आणि झळाळती राहते.
फ्रिजमधून पाणी काढून थेट चेहऱ्यावर वापरणे टाळावे. अति थंड पाणी त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते, विशेषतः संवेदनशील त्वचेसाठी. पाणी थोडावेळ खोलीच्या तापमानावर ठेवल्यानंतरच वापरावे. थंड पाण्याने केसांची मुळेही मजबूत होतात, त्यामुळे केस धुण्याच्या शेवटी थोडे थंड पाणी वापरणे उपयोगी ठरते. थंड पाणी तणाव कमी करण्यास मदत करते, त्यामुळे डोक्यावर थोडे थंड पाणी घेतल्यास मूड फ्रेश होतो. फ्रिजमधील थंड पाणी हे केवळ ताजेपणासाठी नसून, त्वचेसाठी उपयुक्त असा स्वस्त, घरगुती आणि परिणामकारक उपाय आहे. मात्र याचा अतिरेक टाळा. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार समजून वापरल्यास, उन्हाळ्यातील ही सोपी सवय त्वचेसाठी वरदान ठरू शकते.