19.1 C
New York

Sanjay Raut : बाळासाहेबांपेक्षा दिघेंची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न सुरु; राऊतांचा आरोप

Published:

पहिल्या भागाच्या यशानंतर ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘धर्मवीर 2’ चित्रपट आज, शुक्रवारी (27 सप्टेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले की, धर्मवीर 3 चित्रपटाची पटकथा मी लिहिणार आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut alleged that with the help of BJP there is an attempt to raise the image of Anand Dighe over Balasaheb Thackeray)

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, धर्मवीरांची व्याप्ती काय होती हे आम्हाला माहिती आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना माहीत नाही. आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे महाराष्ट्रात पसरलेले जे कोट्यावधी समर्थक आहेत, ते एकनाथ शिंदेंना मानत नाहीत. त्यामुळे अशा चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन प्रतिक निर्माण करायचे काम सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, आनंद दिघे हे निष्ठावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी होते. सर्वसामान्यांच्या मदतीला ते सतत पुढे जायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. एकनाथ शिंदेंपेक्षा राजन विचारे आणि अनेक लोक आनंद दिघेंच्या अत्यंत जवळ होते. त्यामुळे जर तुम्ही धर्मवीरांप्रमाणे शिवसेनेची प्रतिष्ठा जपली असती तर तुम्हाला आता धर्मवीरांवर काल्पनिक कथेनुसार पडद्यावर चित्रपट काढण्याची वेळ आली नसती. आनंद दिघे यांना आम्ही जास्त ओळखायचो. धर्मवीर यांचा एका चित्रपटात मृत्यू दाखवलेला आहे. आता धर्मवीर दोन काढत आहेत, मग धर्मवीर तीन काढतील आणि चार काढतील. हे काय अमर अकबर अँथनी तित्रपट काढत आहेत का? खरं म्हणजे गोलमाल वन, गोलमाल टू आणि गोलमाल थ्री असा चित्रपट यांच्यावर काढला पाहिजे, असा खरमरीत टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये कोण मुसंडी मारणार ? आज निकाल

Sanjay Raut फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, फडणवीस धर्मवीर तीन चित्रपत काढत आहेत. पण त्यांना धर्मवीर यांच्याबद्दल काय माहितीय? त्यांनी औरंगजेबावर चित्रपट काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटायला दिल्ली आणि गुजरातमधून जे नवीन अफजलखान व औरंगजेब येत आहेत, त्यांच्यावर त्यांनी चित्रपट काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. “आनंद दिघेंना आम्ही जास्त ओळखायचो. धर्मवीरच्या पहिल्या भागात त्यांचा मृत्यू दाखवला आहे. मग आता धर्मवीर 2,3,4 काढतायत. ते काय अमर, अकबर, अँथनी सिनेमा काढतायत का? खरंतर गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3 असे चित्रपट यांच्यावर काढले पाहिजेत. आम्ही स्वत: आता सिनेमा काढतोय. फडणवीस धर्मवीर 3 काढतायत. त्यांना काय हो धर्मवीर माहिती? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img