17.7 C
New York

Sanjay Raut : …म्हणून भाजपने नाशिकमधील पक्षप्रवेश थांबवले, नेमकं काय म्हणाले राऊत

Published:

मनसे आणि शिवसेना उबाठाचा उद्या विजयी मेळावा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हा विजयी मेळावा वरळी डोम सभागृह येथे होणार आहे. या ऐतिहासीक मेळाव्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे पक्ष आणि इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तर उद्याचा दिवस हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये बदल घडवणारा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्राला याची उत्सुकता लागलेली आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा ठरली असून अजित भुरे हे सूत्रसंचलन करणार आहेत अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.

Sanjay Raut तुम्हाला इतक्या लोकांचे बूट चाटायचे आहेत

रामदास कदमांच्या वक्तव्यावरुन राऊत म्हणाले शिंदे गटाच्या लोकांचं राजकीय भविष्य संपणार आहे म्हणून त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे, ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. मराठी माणुस एकत्र आल्यामुळे ते घाबरले आहेत, ठाकरेंचं काय होणार राऊतांच काय होणार याची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही मोदी शाह, फडणवीस ,बावनकुळे गिरीश महाजन यांची चिंता करा.तुमच्यासमोर फार मोठे काम आहे. इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आणि पुसायचे आहेत. कालपर्यंत ते शिवसेनेचे होते आज भाजपचे झाले आहेत तुम्ही तुमच्यापूरतं बघा अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर केली आहे

Sanjay Raut प्रधानमंत्री कार्यालयातून प्रवेश थांबवले

नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांचा दबाव होता, गिरीश महाजन हे गुंडांच्या टोळ्या चालवतात. एका सामान्य गुन्ह्यात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांच्यावर मकोका लावण्याची तयारी सुरू केली होती. तुम्ही आमच्या पक्षात या तुमच्यावरील गुन्हा मागे घेऊ, अस त्यांना महाजनांंनी सांगितले. मी यासंदर्भात ट्वीट करुन भाजपचा बुरखा फाडला आहे. या ट्वीटमध्ये मी प्रधानमंत्री आणि अमित शाह यांना टॅग केले होते. त्यानंतर प्रधानमंत्री कार्यालयातून फोन आला व सुनिल बागुल आणि बाबा राजवाडे यांचे प्रवेश थांबवण्यात आले अस माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img