15.9 C
New York

Important changes regarding transactions : जून महिन्यात व्यवहारांबाबत होतील महत्त्वाचे हे बदल, जाणून घ्या माहिती

Published:

मे महिन्याचा आज, शनिवारी शेवटचा दिवस असून, उद्यापासून म्हणजेच रविवारपासून (Important changes regarding transactions) जून महिना सुरू होत आहे. असे काही बदल प्रत्येक महिन्यात होतात, जे तुमच्या खिशावर परिणाम करू शकतात. आता या जून महिन्यातही काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्यात ईपीएफओ, सीएनजी, जीएसटी तसेच कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमधील बदलांचा समावेश आहे. (There will be some important changes regarding transactions in the month of June)

येत्या 1 जूनपासून केंद्र सरकार ईपीएफओचे नवीन व्हर्जन – EPFO 3.0 – लाँच करू शकते. 9 कोटींहून अधिक ग्राहक EPFO 3.0 हे नवे व्हर्जन लाँच झाल्यावर कोणत्याही अडथळ्याशिवाय एटीएममधून देखील ईपीएफचे पैसे काढू शकतील.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी तसेच सीएनजीच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला घरगुती किंवा व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच सीएनजीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतो. अनेकदा किमती स्थिर राहतात. त्यामुळे उद्या म्हणजे रविवारी, या ग्राहकांना दिलासा मिळतो की, खिशाला कात्री लागणार आहे, हे स्पष्ट होईल.

पुढील महिन्याच्या 16 तारखेपासून UPI ​​पेमेंट आणखी जलद होतील. तथापि, 1 जूनपासून या प्रक्रियेवर बँका आणि पेमेंट अॅप्स नव्या नियमांची सज्जता करणार असल्याने अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ट्रॅन्झॅक्शन रिस्पॉन्स कालावधी 30 सेकंदांवरून 15 सेकंदांपर्यंत कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

GSTNमध्ये एक मोठा बदल येत्या 1 जूनपासून होणार आहे. इनव्हॉइस क्रमांक आता केस-इंसेंसिटिव्ह (Upper and lowercase) येत्या महिन्यापासून, मानले जाईल. या बदलानंतर, ABC, abc हे सर्व समान असतील.

जून 2025पासून त्यांच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी कोटक महिंद्रा बँक 1नवीन शुल्क संरचना लागू करणार आहे. यामध्ये 2 टक्के चार्ज (कमीत कमी 450 रुपये आणि जास्तीत जास्त 5 हजार रुपये)ऑटो-डेबिट फेल झाल्यास, डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन, युटिलिटी बिल पेमेंट आणि एज्युकेशन पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. तथापि, हा नियम Kotak Solitaire, Kotak Infinite, Myntra Kotak Credit Card, White Reserve आणि Kotak Signature यांना लागू असणार नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img