14.6 C
New York

Otur : यात्रेतील महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला अटक

Published:


ओतूर (Otur) ,प्रतिनिधी: दि.४ मे ( रमेश तांबे )


पिंपरी पेंढार ( ता जुन्नर ) येथील मुक्तादेवी यात्रेमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला पिंपरी पेंढार येथील स्थानिक ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले.

सुरेश गौतम चव्हाण,योगिता गणेश पवार,माया दुर्वेश पवार सर्व रा.इमामपूर, ता. पैठण, जि.छत्रपती संभाजी नगर अशी  दागिने चोरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

दागिने चोरी बाबत संबंधित महिलांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सदर टोळी कडून ओतूर पोलिसांनी कारसह चार लाख दहा हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली.

दि.२४ एप्रिल रोजी पिंपरी पेंढार येथील ग्रामदैवत मुक्तादेवी यात्रेमध्ये येथील महिलांचे मंगळसूत्रासह इतर सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असून, पिंपरी पेंढारचे स्थानिक ग्रामस्थ व काही महिलांनी चोरट्यांना चोरी करताना रंगेहात पकडले असल्याची माहिती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांना दिली.थाटे यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठवून गावकऱ्यांनी पकडून ठेवलेल्या महिला तसेच एक पुरूष यांना ओतूर पोलीस स्टेशनला आणले त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता ते प्रथम उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

संबंधित महिलांनी ओतूर पोलिसात या टोळीविरूद्ध तक्रार दाखल केली असून,एका महिलेचे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र अंदाजे किंमत एक लाख ६० हजार  रूपये किमतीचे चोरी झाले असले असून इतर महिलांचे दागिने देखील चोरी झाल्याचा ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

     ओतूर पोलिसांनी तीनही आरोपीना जुन्नर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी  यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे,अधिक चौकशीत  त्यांनी सदरचे मंगळसूत्र चोरी केले असले बाबत कबुली दिली आहे. चोरी केलेले मंगळसूत्र देखील त्यांनी पोलिसांना ताब्यात  दिले आहे.तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारूती अल्टो कार नंबर 

( एम.एच.२० ए.जी. ९२०६) कारची अंदाजे किंमत २ लाख ५० हजार ही कार जप्त करण्यात आली असून,दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र अंदाजे किंमत एक लाख ६० हजार रूपये असा एकूण ४ लाख १० हजार  रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश साबळे, महिला पोलीस अंमलदार मयुरी खोसे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img