23.5 C
New York

Monsoon Update : जूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

Published:

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे, मान्सून महाराष्ट्रात यंदा (Monsoon Update) तब्बल बारा दिवस आधीच दाखल झाला आहे, दरम्यान देशभरात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण जून महिन्यात कसं असेल याबाबतचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज समोर आला आहे. हवामान खात्याकडून सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता यंदा जून महिन्यात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकाली सरासरीच्या तुलनेत 108 टक्के इतकं असणार आहे.यंदा जूनमध्ये पडणारा पासून मागच्या 16 वर्षांचं रेकॉर्ड मोडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जून महिन्यात उत्तर-पश्चिम भारतामध्ये पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर भारतात मात्र कमी पाऊस पडू शकतो.

मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा मृत्युंजय महापात्रा भारतीय हवामान विभाग आयएमडीचे संचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा अंदाज आहे. आयएमडीने सोमवारी म्हटलं आहे की, यंदा मान्सून आपल्या सामान्य वेळेपेक्षा 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे.1950 नंतर असं पहिल्यांदाच घडलं आहे. मान्सूनचं आगमन तर दुसरीकडे यंदा भारताच्या मुख्य भूमीवर देखील हे वेळेआधीच झालं आहे. 2009 नंतर म्हणजे तब्बल 16 वर्षांनंतर भारतात मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे.

केरळमध्ये सामान्यपणे मान्सून एक जूनला प्रवेश करतो, तर मुंबईमध्ये 11 जूनला दाखल होतो. मान्सून संपूर्ण देशाला आठ जुलैपर्यंत व्यापतो. तर 17 सप्टेंबरापासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून देशातून माघारी जातो. मात्र वेळेपूर्वीच यंदा मान्सून दाखल झाला असून, सरसारीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Monsoon Update महाराष्ट्राला पावसानं झोडपलं

दरम्यान महाराष्ट्राला दुसरीकडे पावसानं प्रचंड झोडपलं आहे, राज्यात पाऊस गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरूच आहे. कोकणासह विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यंदा मे महिन्यातच नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. गेले दोन दिवस मुंबईत देखील जोरदार पाऊस झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img