23.5 C
New York

Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी 3’ मधून परेश रावल बाहेर, कारण काय?

Published:

सोशल मीडियावर ‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) बाबात गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चांना उधाण आहे. ‘हेरा फेरी 3’ अचानक परेश रावल सोडणार असल्याची चर्चा सुरु असल्याने सोशल मीडियावर चाहाते नाराजी व्यक्त करत आहे. तर आता या चित्रपटाबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. परेश रावल (Paresh Rawal) या चित्रपटातून बाहेर झाले आहे. या वृत्तानुसार, परेश रावलने प्रोडक्शन हाऊसकडून सायनिंग अमाउंट म्हणून घेतलेले सर्व पैसे व्याजासह परत केले आहेत.

अभिनेता अक्षय कुमारचं प्रॉडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करत आहे. परेश रावल आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये झालेल्या काही वादानंतर परेश रावलविरुद्ध 25 कोटींचा खटला प्रॉडक्शन हाऊसकडून दाखल करण्यात आला होता. यानंतर सायनिंग अमाउंट आता परेश रावलने परत केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Hera Pheri 3 परेश रावलकडून सायनिंग अमाउंट व्याजासह परत

बॉलीवूड हंगामाने दिलेल्या या वृत्तानुसार, अभिनेता परेश रावलने 15 टक्के वार्षिक व्याजदरासह 11 लाख रुपयांची सायनिंग अमाउंट परत केली आहे. या सीरिजमधून याचबरोबर परेश रावलने बाहेर पडण्यासाठी काही पैसे वाढून देखील दिले असल्याचा दावा बॉलीवूड हंगामाने एका सूत्राच्या हवाले केला आहे.

बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, परेश रावल यांना या चित्रपटात काम करण्यासाठी 15 कोटी रुपये देण्यात येणार होते. या रक्कमेपैकी 11 लाख रुपये परेश रावल यांना टर्म शीटनुसार देण्यात आले होते तर उर्वरित रक्कम चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्यानं मिळणार होते. पुढील वर्षी ‘हेरा फेरी 3’ चं चित्रीकरण सुरु होणार असून चित्रपट 2026 च्या शेवटी किंवा 2027 च्या सुरुवातीला प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे उर्वरित पैसे त्यामुळे परेश रावल यांना मिळण्यासाठी आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागणार होती त्यामुळे त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

‘हेरा फेरी’ सीरिजमधील पहिला चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर 2006 मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल आला होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टसाठीत्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img