16.8 C
New York

Operation Sindoor : भारताने एअर स्ट्राइकच्या माध्यमातून आपल्या अधिकारांचा वापर केला, काय म्हणाले ?

Published:

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखेर भारतीय सैन्याकडून बदला (Operation Sindoor) घेण्यात आला आहे. पाकिस्तानला कानोकान खबर होऊ न देता भारतीय सैन्याने बुधवारी (ता. 7 मे) मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील एकूण 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले. हा हल्ला कसा झाला, याची संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. सकाळी 10.30 वाजता भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली. विंग कमांडर व्योमिका सिंह, कर्नल सोफिया कुरेशी यांनी प्रसार माध्यमांना “ऑपरेशन सिंदूर”ची संपूर्ण माहिती दिली.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातील भारतावर आजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आणि शहीदांची चित्रफित दाखवण्यात आली. तर आता यापुढे असे होणार नाही अर्थात ‘NO MORE’ असे या चित्रफीतच्या माध्यमातून पाकिस्तानला ठणकावून सांगण्यात आले. (OPERATION SINDOOR India used its powers through air strikes, what did the Foreign Secretary say?)

भारताचे परराष्ट्रीय सचिव विक्रम मिसरी यांनी हे एअर स्ट्राइक नेमके कसे करण्यात आले, याची माहिती देण्याआधी या पहलगाम हल्ल्याची माहिती दिली. तसेच, या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा पाठिंबा असलेल्या टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती दिली. यावेळी विक्रम मिसरी म्हणाले की, 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. 25 भारतीय आणि एका नेपाळी व्यक्तीला यात मारण्यात आले. ही घटना आजवरची गंभीर घटना आहे. पहलगामवरील हल्ला अत्यंत निर्दयीपणे केलेला हल्ला होता. कारण कुटुंबीयांसमोरच हा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला जम्मू आणि काश्मीरात सामान्य होणाऱ्या परिस्थितीला प्रभावित करणारा होता. अशा प्रकारे हल्ला करणे हा हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण असे झाले नाही.टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पण भारताने मे आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत याबाबतची माहिती दिली होती.

सिंधूपासून सिंदूरपर्यंत, भारताने उचलली ही 15 पावले

या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे आतंकवाद्यांसोबत संबंध असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पाकने नेहमीच दहशतवाद्यांना आसरा दिला आहे. पाकिस्तानमुळे आतंकवादी सुरक्षित राहात आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विविध राज्यात लोक अस्वस्थ दिसून आले. हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आतंकवाद्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट त्यांनी आम्ही असे केले नाही, असेच सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान सैन्याकडून हल्ला करण्यात आला. तर यापुढे आणखीही हल्ले होऊ शकतात, त्यामुळे उपाययोजना करणे गरजेचे होते. ज्यामुळे आता भारताने एअर स्ट्राइक करून आपल्या अधिकारांचा वापर करत हा हल्ला केला आहे. हा हल्ला आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी करण्यात आला आहे, असे यावेळी परराष्ट्रीय सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img