आज इयत्ता 12 वीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची काही क्षणात प्रतीक्षा संपणार आहे. पुढच्या काही तासांत इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे. (Maharashtra Board 12th Result)तशी अधिकृतपणे माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. दरम्यान, हा निकाल कुठं पाहावा? हे जाणून घ्या.
Maharashtra Board 12th Result दुपारी १ वाजता निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन पद्धतीने सोमवारी म्हणजेच 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी शासाने काही अधिकृत संकेतस्थळे दिली आहेत.
Maharashtra Board 12th Result संकेतस्थळं कोणती?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. तुम्हाला खालील अधिकृत संकेतस्थळांवर याच परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल.
सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण परीक्षेस प्रविष्ट झालेल्या वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका त्याचप्रमाणे संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसंच, https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.
Maharashtra Board 12th Result या संकेतस्थळावर निकाल
1) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
2) https://results.digilocker.gov.in
3) https://mahahsscboard.in
4) http://hscresult.mkcl.org