17.6 C
New York

Nilesh Lanke : प्रत्येक एसटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, खासदार निलेश लंके आक्रमक

Published:

स्वारगेटमध्ये तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) अॅक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. महिला सुरक्षा संदर्भात खासदार लंके यांनी माळीवाडा आणि पुणे बस स्थानक परिसराची पाहणी केलीय. प्रवासी महिलांसोबत संवाद साधलाय. तसेच प्रत्येक एसटीबसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे आदेश खासदार निलेश लंके (Ahilyanagar) यांनी दिले आहेत.

पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर एका युवतीवर एका नराधामाने बलात्कार केलाय. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला लाजिरवाणी असून काळीमा फासणारी घटना आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही. एसटी महामंडळाचा (Ahilyanagar News) प्रवास सुरक्षित असून शेतकरी बांधव, गोरगरीब वर्ग लालपरीतून प्रवास करत असतो. मात्र, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. तर स्थानकात फॅन आणि बसण्यासाठी बाकडे नाहीत, कर्मचारी देखील सुरक्षित नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. माजी आरोग्यमंत्र्याचा मुलगा हरवला होता, त्याला एका तासात शोधून देण्याची तत्परता सरकारने दाखवली. मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे अक्षरश: दुर्लक्ष असते.

मी राज्य परिवहन मंडळाकडे मागणी करणार आहे की, प्रत्येक एसटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. त्याचे कंट्रोल डेपोमध्ये ठेवा. एसटीनं प्रवास करणं देखील सुरक्षित राहिलं नाहीये. माता, भगिनी आणि कॉलेजच्या मुलींची छेड-छाड होण्याचे प्रकार देखील वाढले असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केलाय. अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्थानक आणि पुणे बसस्थानकामधील सुरक्षेतेची पाहणी खासदार निलेश लंके यांनी केली. यावेळी त्यांनी वाहक चालक आणि प्रवाशांशी संवाद साधला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img