11 C
New York

Eknath Shinde : तानाजीरावांचा नाद कुणी करायचा नाही; भरसभेत CM शिंदेचा एल्गार, ठाकरेंवर हल्लाबोल

Published:

धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उन्हाचा तडाखा आहे, दोन वाजलेत. तरीही आमच्या लोकांमध्ये येवढी ऊर्जा आहे की, येत्या 20 तारखेला आमच्या तानाजीरावांना रेकॉर्डब्रेक विजयी केल्याशिवाय राहणार नाही. परांड्याचे किल्लेदार डॉ. तानाजीराव सावंत यांची ही जाहीर सभा आहे, परंतु मला वाटतंय की ही विजयाची सभा आहे.

तानाजीरावांचा नाद कुणी करायचा नाही, असं भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तानाजीराव जादूगार आहेत, ते जादू करून माणसाचं प्रेम मिळवतात, आपलंस करतात. त्यांच्याकडे माणसं जोडण्याची जादू आहे. परांड्याच्या जनतेच्या मनात काय आहे, ते गर्दीने ठरवला आहे, निकाल देखील ठरवला आहे. 23 तारखेला हा एकनाथ शिंदे फटाके फोडायला पुन्हा येथे येतोय. खरं म्हणजे, समोर उबाठा नाही. शिवसेना आमची म्हणणाऱ्यांनी मशाल विकून टाकली आणि मतदारसंघपण देवून टाकली. त्यांची मशाल घराघरांत आग लावणारी आणि समाजात द्वेष पसरवणारी आहे. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, असं त्यांचं आहे. त्यांना माहिती आहे की, तानाजी सावंतासमोर आपली डाळ शिजत नाही. त्यामुळे पडायचाच तर दुसऱ्या कुणाचा उमेदवार पडू दे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

काँग्रेसकडे घोटाळापत्र, मोदींचा नाशिकमधून विरोधकांवर हल्लाबोल

बाळासाहेबांनी कमावलेली शिवसेना आणि धनुष्यबाण कॉंग्रेसच्या दावणीला बांधला, तो सर्वात दुर्दैवी दिवस होता. विचार विकायला निघाले, मग आम्ही उठाव करायचा विचार केला. तेव्हा तानाजीराव आमच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. तानाजीरावांनी आरोग्यविभागात खूप सुधारणा केल्या.ग्रीनिज बुकमध्ये नोंद झाली,असं काम दोन वर्षात तानाजीरावांनी केलंय. दोन हजार कोटी रूपये परांड्याच्या विकासासाठी दिलेत, ही देणा बॅंक आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सोन्याच्या चमचा तोंडात घेवून आलेल्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केलीय.

मनगटात धनुष्यबाण पकडायला जोर लागतो, तसं योजना बनवायला देखील मजबूत लागतं. वाघाचं कातडं पांघरूण लांडगं वाघ होतं नाही, त्याला वाघच असावं लागतं. बाळासाहेबांची, आनंद दिघेंची शिकवण पुढे नेतोय. मराठवाड्यात उजनीमधून येणारं पाणी कोळगावमध्ये पडायलाच पाहिजे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तानाजीराव तुमचं काम बोलतंय. 20 तारखेला सगळी कामं बाजूला ठेवायची आहेत. डोळ्यात तेल घालून जागरूक राहा. धनुष्यबाणासमोरील बटण दाबा आणि तानाजीरावांना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img