11 C
New York

Otur : ओतूरच्या गाढवपट आवळी येथे बिबट्या जेरबंद 

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.५ नोव्हेंबर ( रमेश तांबे )

ओतूर (Otur) ( ता.जुन्नर ) येथील गाढवेपट (आवळी ) येथे मंगळवार दि.५ रोजी पहाटेच्या सुमारास, वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली. 

याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री ठोकळ हे अधिक माहिती देताना म्हणाले की,ओतूर येथील गाढवपट (आवळी ) या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने,या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावला होता. मंगळवारी पहाटे अंदाजे दोन ते अडीच वर्ष वयाचा एक नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाला असल्याबाबत येथील शेतकऱ्यांनी ओतूर वनविभागाशी संपर्क केला.

बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूर वनविभागाला मिळताच, वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस.एम.बुट्टे,वनरक्षक व्ही.ए.बेले,वनरक्षक डी.बी.साबळे तसेच वन कर्मचारी गणपत केदार, किसन केदार, फुलचंद खंडागळे व गंगाराम जाधव तसेच स्थानिक शेतकरी विक्रम अवचट,अनिकेत गाढवे,समीर गाढवे आदी शेतकरी व नागरिकांच्या सहकार्याने सदर बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img