21.7 C
New York

Sanjay Raut : लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांवर, राऊतांचा आरोप

Published:

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आला आहे. (Sanjay Raut) त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस सोडा सणासुदीत पगार तरी मिळेल की नाही, याची खात्री नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेचे कवित्व किती महागात पडेल याची उजळणी केली. त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यात अर्थखाते केवळ नावालाच उरल्याचा आरोप त्यांनी केला.

Sanjay Raut पगार मिळण्याची शक्यता नाही

होमगार्ड आणि सेक्युरीटींना लाडकी बहीण योजनेमुळे पगार मिळतील की नाही याची शंका आहे. योजनेकडे सर्व पैसा वळवला आहे. या योजनेचं श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे. फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे. माझ्याकडे पत्र आहे. ही योजना भाजपनेच कशी आणली, फडणवीस यांनी आम्हीच कशी आणली हे दाखवण्याचं श्रेय करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

भाजपाला धक्का! मंत्री विजयकुमार गावितांच्या बंधूंचा राजीनामा

या योजना मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान या ठिकाणी सुरू होत्या. फक्त निवडणुकीसाठी या योजना आणण्यात आल्या. लाडक्या बहीण योजनेचा कोणताही पैसा तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर जाणार नाही. ही योजना जुमला आहे. भ्रष्टाचार आहे, असं स्वत नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन म्हटलं आहे. अर्थ खातं अस्तित्वात नाही, खडखडाट आहे. तिजोरी रिकामी आहे. मतांसाठी योजना तरीही रेटली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

Sanjay Raut हा निवडणूक फंडा

मध्यप्रदेश, गोवा राजस्थान अशा ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या योजना सुरू होत्या त्या योजना महाराष्ट्र मध्ये आणून फक्त निवडणुकीसाठी त्याचा वापर करण्यात येत आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही निवडणुकीसाठी केलेला फंडा आहे असे मी म्हणत नसून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img