21.7 C
New York

Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, न्यायालयात काय घडले?

Published:

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरत शिक्षा केली आहे. त्यांना पंधरा दिवसांची शिक्षा दिली आहे. मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी यावेळी न्यायालयात काय, काय घडले, त्याची माहिती माध्यमांनी दिली. सोमय्यांचे वकिल म्हणाले, न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. न्यायपालिकाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन कोणत्याही पदावर किंवा किती उच्च पदावर तुम्ही असला तरीही करु शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. निकालाची ही प्रक्रिया २८ महिने चालली आहे. त्यात कोणीही पुराव्याशिवाय कोणावर बेताल वक्तव्य करु शकत नाही, असे वकिलांनी सांगितले.

Sanjay Raut न्यायालयात काय घडले?

न्यायालयात आज निकालाचा दिवस होता. संजय राऊत यांना न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन दोषी ठरले. तसेच संजय राऊत यांच्या शिक्षेवर युक्तीवाद करण्याचे त्यांच्या वकिलांना सांगितले. त्यात संजय राऊत यांचे वकील म्हणाले, संजय राऊत यांना केवळ दंड करुन सोडा. राऊत यांच्या वकिलांच्या या युक्तीवादाला सोमय्या यांच्या वकिलांनी विरोध केला. त्यांनी म्हटले की, संजय राऊत नेहमी बेताल वक्तव्य करतात. त्यांना महिलांची बदनामी करण्याची सवय आहे. मेधा सोमय्या यांच्यावर बेताल वक्तव्य त्यांनी केले, हे आम्ही सिद्ध केले. त्यामुळे त्यांना दोन वर्षांच्या शिक्षेची मागणी आम्ही केली.

अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, न्यायालयाने सुनावली शिक्षा

दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकवल्यावर न्यायालयाने म्हटले की, संजय राऊत राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी पदाची प्रतिष्ठा ठेवायला पाहिजे होती. संजय राऊत यांना १५ दिवसांची शिक्षा आणि २५ हजार दंड करण्यात येत आहे. हा दंड सोमय्या यांना देण्यात येणार आहे.

Sanjay Raut राऊत यांनी २७ आरोप केले

संजय राऊत यांना पोलिसांनी कस्टडीत घेतल्याचे दरम्यान, भाजप नेते किरीट्ट सोमय्या यांनी यावेळी सांगितले. राऊत यांनी २७ आरोप केले. एकाचेही पुरावे दिले नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेल्याचे त्यांनी म्हटले. तर मेधा सोमय्या म्हणाल्या, माझ्या संस्थेला किंवा माझ्या कुटुंबावर कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरे जाईल. या कठीण काळात अनेकांची मला साथ मिळाली. आज मला न्याय मिळाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img