19.1 C
New York

Maharashtra Cabinet Meeting :  राज्यातील तब्बल 14 ITI चे नामांतर होणार, जाणून घ्या नवीन नावे

Published:

राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्यात येणार आहे. (Maharashtra Cabinet Meeting) कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा महत्वाचा निर्णय जाहीर केलाय.आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे ते म्हणाले.ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव देण्यात आले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार या 14 आयटीआय महाविद्यालयांची नावे ही दिवंगत नेत्यांची, महान व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव ठाण्यातील आयटीआय महाविद्यालयाला यावेळी देण्यात आले असून मुंबईतील आयटीआय महाविद्यालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच, बीडमधील आयटीआय महाविद्यालयाला दिवंगत विनायकराव मेटे यांचे नाव देण्यात आले आहे.

मुंबईकरांसाठी महत्वाची अपडेट, रेल्वेच्या ‘या’ मार्गावर पुन्हा ब्लॉक


Maharashtra Cabinet Meeting नेमकं कुठल्या आयटीआयला कुणाचं नाव?

  1. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  2. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि.नाशिक : महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  3. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे : धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  4. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड : कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  5. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  6. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर : भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  7. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  8. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  9. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती : संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.
  10. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा : दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.
  11. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव : कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
  12. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव : आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.
  13. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई. : दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.
  14. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई. : महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img