13.2 C
New York

Sanjay Raut : राहुल गांधीचा जीव धोक्यात; संजय राऊतांनी केला हा दावा

Published:

‘लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र सुरु असून त्यांच्या जीवाला मोठा धोका आहे’ असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. बुधवारी (18 सप्टेंबर) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. “तुम्हाला आठवत असेल, मी आधीही हे म्हणालो होतो की राहुल गांधींच्या हत्येचे षडयंत्र रचले जात आहे. त्यावेळेस मी हवाबाजी करत असल्याची टीका माझ्यावर करण्यात आली होती. काही राजकीय पक्ष आणि त्यांच्या संघटनांकडून बाहेर देशातून हे षडयंत्र रचले जात असल्याचे मी म्हटले होते.” असा दावा त्यांनी यावेळी केला.

पुढे संजय राऊत म्हणाले की, ‘परदेशात हे षडयंत्र रचले जात असून भारतामध्ये त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. दोन दिवसांपासून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, मी जे आधी म्हणालो होतो त्याला या घटनांमुळे पुष्टी मिळाली आहे.’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.’या देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, उत्तरप्रदेशमधील एक मंत्री, महाराष्ट्रातील भाजपसोबत युतीत असलेले एक आमदार हे सर्व एकाच भाषेत बोलत आहेत, की राहुल गांधींवर हल्ला करा. कोण म्हणत की त्यांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस देईन, कोणी त्यांना दहशतवादी म्हणत तर कोणी तरी त्यांच्यावर हल्ला करा, अशी भाषा वापरतात. ही एका षडयंत्राची रचना आहे.’असे ते म्हणाले.

लेकीच्या राजकारणासाठी खडसे…. अजितदादा गटाच्या महिला नेत्याची टीका काय?

‘ज्याप्रकारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, यामुळे कोणाच्या तरी मनात भीती निर्माण झाली आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, हे या देशाच्या लोकशाहीत बसत नाही. हे सर्व प्रकार रशियामध्ये घडतात. पुतीन यांनी विरोधी पक्षनेत्याला जीवे मारले असून इतरही देशांमध्ये हे चालत असेल, जिथे लोकशाही नाही तर हुकूमशाही आहे. अशी विधाने जर ऐकून पंतप्रधान आणि गृहमंत्री मूक गिळून गप्प असतील, तर मी समजतो की हा सर्व षड्‍यंत्राचा भाग आहे.’ असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img