21.7 C
New York

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा CM शिंदेंना रोखठोक इशारा

Published:

मी मुख्यमंत्र्यांना देखील सांगतो अगदी जाहीर सांगतो. संभाजीनगरच्या खासदाराचं आणि पालकमंत्र्यांचं ऐकून मराठ्यांशी दगाफटका करू नका. मुख्यमंत्र्‍यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. मी देखील रोज सांगतोय की फक्त मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात. त्यांच्यावर विश्वास आहे तो विश्वास त्यांनी ढळू देऊ नये. कोणाचं ऐकून करोडो मराठ्यांशी दगाफटका करू नका. मुख्यमंत्री साहेबांनी मराठ्यांचा गेम करायचा नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी रोखठोक इशारा दिला.

दोन ते तीन लोक मुख्यमंत्र्यांचे (Eknath Shinde) कान फुंकत आहेत. त्यानंतर मराठा समाजाचा गेम अन् दगाफटका करू नका. शंभूराज देसाईंनाही सांगतो की मुख्यमंत्र्‍यांना समजून सांगा.. याचं त्याचं ऐकून जर मराठा समाजाचा गेम केला तर ते मराठा समाजाच्या मनातून उतरतील, असेही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी महायुती सरकारकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभुमीवर आज मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले, शंभूराज देसाईं सांगितलं होतं की आम्ही हैदराबादला जातोय. हैदराबाद गॅझेट आणि तीन हजार पुरावे या हालचाली आधीच्याच आहेत आताच्या नाहीत. शंभूराज देसाईंनी तीन महिन्यांपूर्वीच या हालचाली सुरू केल्या होत्या. आता ते आणलंय तर त्यावर त्यांचा अभ्यास सुरू आहे. हे समजून घ्या आधी.

अभ्यास करून लागू करायचं राहिलं होतं. आम्ही आधीपासून म्हणतोय की तुम्ही सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. हैदराबाद गॅझेटसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट सुद्धा लागू करा ही आमची एक वर्षांपासूनची मागणी आहे. आता हे लागू करण्याच्या हालचाली सरकार पातळीवर सुरू आहेत. हे सगळं यश राज्यातल्या गोरगरीब मराठ्यांचं आहे. पण आम्ही एवढ्यावर थांबणार नाही आम्हाला सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी सुद्धा हवी आहे. 2004 च्या शासन आदेशात देखील आम्हाला दुरुस्ती हवी आहे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Manoj Jarange मुख्यमंत्री साहेब कुणाचं ऐकून दगाफटका करू नका

या आजच्या हालचाली नाहीत त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवण्याची गरज नाही. हे सगळं श्रेय गोरगरीब मराठ्यांचं आहे. बाकी कुणीही याचं श्रेय घेण्याचं काहीच कारण नाही. मी मुख्यमंत्र्यांना देखील सांगतो अगदी जाहीर सांगतो. छत्रपती संभाजीनगरच्या खासदाराचं आणि पालकमंत्र्यांचं ऐकून मराठ्यांशी दगाफटका करू नका. मुख्यमंत्र्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. मी देखील रोज सांगतोय की फक्त मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देऊ शकतात. त्यांच्यावर विश्वास आहे तो विश्वास त्यांनी ढळू देऊ नये. कोणाचं ऐकून करोडो मराठ्यांशी दगाफटका करू नका. मुख्यमंत्री साहेबांनी मराठ्यांचा गेम करायचा नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img