19.1 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांच्या मोदींसमोर तीन मोठ्या अटी; म्हणाले, माझ्या गाडीत…

Published:

शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्राची झेड प्लस सुरक्षा घेण्यास तयारी दर्शवली आहे. पण ही सुरक्षा घेण्यापूर्वी पवारांनी मोदींसमोर तीन मोठ्या अटी ठेवल्या आहेत. याबाबत पवारांनी काही अटी शर्थीचे पत्र केंद्राला पाठवले असून, केंद्र सरकार पवारांच्या अटी-शर्थी मान्य करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार यांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. यावेळी शरद पवारांतर्फे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

Sharad Pawar पवारांच्या पत्रातील अटी-शर्थी नेमक्या काय?

केंद्राच्या झेड प्लस सुरक्षा घेण्यापूर्वी पवारांनी केंद्राला काही अटी-शर्थींचे पत्र पाठवले आहे. यात त्यांनी केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार, कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार तसेच स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल अशा प्रमुख तीन अटी पत्रात नमुद केल्या आहेत. या अटी मान्य केल्यातरच केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाईल असे पवारांनी म्हटले आहे.

100 जागांवर महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

Sharad Pawar योग्य आणि अचूक माहिती काढण्यासाठी सुरक्षा

केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मला कोणत्या प्रकाराचा मात्र मी स्वत: आधी धोका आहे का, ते पडताळून पाहीन, त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन, असं पवार म्हणाले होते. एवढेच नव्हे तर, आगामी काळात विधानसभांचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी मला सगळीकडे फिरावं लागत आहे. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती काढण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था केली असावी अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली होती.

Sharad Pawar कशी असते झेड प्लस सुरक्षा व्यवस्था

दहापेक्षा जास्त एनएसजी, एसपीजी कमांडो, पोलीस यांच्यासह एकूण 55 सुरक्षा कर्मचारी झेड प्लस सुरक्षेत असतात. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आणि सीआरपीएफचे जवानही यात तैनात असतात. संबंधित व्यक्तीची चोवीस तास सुरक्षा करणे या कमांडोंचं काम हेच असते. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनेही असतात. अतिशय महत्वाच्या व्यक्तींनाच ही सुरक्षा दिली जाते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षेत एनएसजी कमांडो तैनात असतात आणि हे कमांडो पूर्णपणे प्रशिक्षित असतात. या सुरक्षा व्यवस्थेतील जवान कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास कायम तयार असतात. या जवानांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची हत्यारे असतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img