पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल युक्रेन दौऱ्यावर होते. भारत हा रशियाचा मित्र देश. त्यात रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू. अशा परिस्थितीत मित्र देशाच्या पंतप्रधानाने युक्रेनचा दौरा करावा आणि यावर रशियाची प्रतिक्रिया काय असेल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतलेल्या भूमिकेने सारेच अचंबित झाले. जोपर्यंत पीएम मोदी अमेरिकेत आहेत तोपर्यंत रशिया युक्रेवर हल्ला करणार नाही अशी घोषणा पुतिन यांनी केली होती. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन युक्रेन दौऱ्यावर असतानाही रशियाने युक्रेनवरील मिसाइल हल्ले थांबवले नव्हते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडचा दौरा आटोपून काल युक्रेनमध्ये दाखल झाले होते. येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मोदींचे स्वागत केले. बऱ्याच कालावधीनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा यु्क्रेन दौरा होता. त्यामुळे अमेरिकेसह जगाच्या नजरा या दौऱ्याकडे होत्या. मोदी काय बोलणार याचीही उत्सुकता होती. मोदींनीही जगाला अपेक्षित असेच वक्तव्य केले. युद्धा हा शांततेचा मार्ग नाही. दोन्ही देशांतील युद्ध आता थांबायला हवे.
युक्रेन संघर्ष समाप्त करण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे संवाद. भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. भारत शांती आणि प्रगतीच्या मार्गात सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार करारावर सह्या केल्या. या दौऱ्याचे अमेरिकेने कौतुक केले होते. तर रशियाची काय प्रतिक्रिया असेल याची उत्सुकता होती. रशियाची अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी काल रशियाने एक मोठा घेतला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी जोपर्यंत युक्रेनमध्ये आहेत तोपर्यंत रशिया युक्रेनवर एकही हल्ला करणार नाही अशी घोषणा केली होती.