पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात काहींना काही कारणाने नेहमी चर्चेत राहणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके चर्चेत आले आहे. लक्ष्मण हाके (Laxman Hake) गुरुवार 3 जुलै रोजी गिरगाव चौपटी येथे ओबीसीच्या (OBC) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त मिळत नसल्याने जलसामाधीचे आंदोलन करत होते. लक्ष्मण हाके यांची जीभ यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना घसरली.
आंदोलन करत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी माध्यमांसमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवीगाळ केली. ‘हा अजित पवार आमच्या पोरांना शिकून देत नाही.***खोर आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही. निधी मराठा विद्यार्थ्यांना, सारथीला दिला जातो पण महाज्योतीला निधी दिला जात नाही. ओबीसी मुलांवर अन्याय केला जातो. असं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले.
गुरुवारी 3 जुलै रोजी ओबीसींच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नसल्याने लक्ष्मण हाके गिरीगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) येथे काही विद्यार्थ्यांसह आंदोलन करत होते. यावेळी लक्ष्मण हाके समुद्रात खोलपर्यंत गेले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आणि तेव्हा हाके यांनी माध्यमांसमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवीगाळ केली.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एक्स वर लक्ष्मण हाके यांच्या चॅटींचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये हाके यांनी बंडु काशीद यांना आक्षेपार्ह मेसेज केला आहे. यावर टीका करताना अमोल मिटकरी यांनी झाकणझुल्याची भाषा आणि भाषेचा स्तर बघा अशी टीका केली आहे.