17.7 C
New York

Malnourished Children : राज्यात 1 लाख 82 हजार कुपोषित बालके

Published:

विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज राज्यात 1 लाख 82 हजार 443 कुपोषित बालके आढळली असून (Malnourished Children) 1 लाख 51 हजार 643 बालकेमध्यम कुपोषित श्रेणीत त्यापैकी राज्यात सर्वाधिक 30 हजार 800 बालके असल्याची धक्कादायक माहिती (03 जुलै) दिली आहे. मुंबई उपनगरात राज्यात सर्वाधिक 2 हजार 778 तीव्र कुपोषित बालके आढळून आल्याचे तटकरे यांनी उत्तरात नमूद केले आहे.

काँग्रेसचे नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे आणि अन्य आमदारांनी कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. राज्यभरातील कुपोषित बालकांची आकडेवारी महिला आणि बालविकास विभागाने या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात 8 हजार 944 मध्यम कुपोषित, तर 1 हजार 852 तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. 6 हजार 377 मध्यम कुपोषित तर 1 हजार 741 बालके तीव्र कुपोषित धुळे जिल्ह्यात आहेत.

पोषण श्रेणीनुसार मुंबई महानगरपालिकेने 6 हजार 92 बालकांच्या पोषण श्रेणीची नोंदच केली नसल्याचे आणि सर्वाधिक कुपोषित बालके मुंबईच्या उपनगरात असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. महिला आणि बालविकास विभागाने त्यावरील लेखी उत्तरात ही माहिती अंशतः खरे असल्याचे मान्य केले आहे.

Malnourished Children अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त

राज्यात सुमारे 3 हजार 602 पदे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची रिक्त आहेत. त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकांचीही पदे रिक्त आहेत. ही रक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img