9.8 C
New York

Mumbai Police : मुंबईत परवानगीशिवाय उडवला ड्रोन, 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल…

Published:

मुंबई शहरात (Mumbai) ड्रोन उडवण्यावर बंदी असतानाही परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका २२ वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या. अरमल्ला जेसी आयझॅक अब्राहम लिंकन (Armalla Jesse Isaac Abraham Lincoln) असं या तरुणाचे नाव आहे.

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, सातत्याने ड्रोल हल्ले होत आहेत. त्यामुळं देशभरातील अनेक भागात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, मुंबईतील कुलाबा परिसरात एक ड्रोन उडताना दिसला. एका २२ वर्षीय तरुणाने कुलाबा परिसरात परवानगीशिवाय हा ड्रोन उडवला होता. सुरक्षा भंग केल्यानेत्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्याच्या विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीघ्र कृती पथक कार्यरत असताना सुधाकर रावसाहेब पाटील आणि त्यांचे टीम प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधीर कामठे पहाटे 4 वाजता गस्त घालत असताना त्यांना आकाशात एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. निरीक्षण केल्यानंतर ती वस्तू ड्रोन असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याबद्दल पोलिसांनी या तरुणाला पकडले.

दरम्यान, या तरुणाकडे DJI Air 3S प्रकारचा ड्रोन आणि रिमोट कंट्रोल मिळाले असून एकूण 70000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या तरुणाने कोणत्या उद्देशाने ड्रोन आकाशात उडवला होता? आणि त्याचा काय हेतू होताय़ या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत..

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img