13.7 C
New York

India Pakistan War : दाखवला डावा, मारला उजवा! पाकिस्तानच्या 500 ड्रोनची तज्ज्ञांकडून चिरफाड

Published:

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय (India Pakistan War) झाला. युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तणावादरम्यान पाकिस्तानकडून (Pakistan) मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर झाल्यामुळे हा बदल झालाय. 8 ते 9 मे च्या रात्री पाकिस्तानने 500 ड्रोन भारतीय हवाई क्षेत्रात पाठवले. लडाखमधील लेह ते गुजरातमधील सर क्रीकपर्यंत मोक्याच्या ठिकाणी हे ड्रोन दिसले. यातील बहुतेक ड्रोन नि:शस्त्र (Pak Army) होते. भारतीय सैन्याने ते सहजपणे निष्क्रिय केले. भारत-पाकिस्तान संघर्षात असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. असे नि:शस्त्र अन् स्वस्त ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा नेमका काय हेतू होता, याची तज्ज्ञांनी पोलखोल केली आहे.

भारतशक्तीच्या अहवालानुसार तज्ञांनी म्हटलंय की, पाकिस्तानने (Pakistan) केलेला ड्रोन हल्ला हा कोणतेही मोठे नुकसान करण्याऐवजी भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली , रडार कव्हरेज आणि प्रतिक्रिया वेळेची चाचणी घेण्याचा एक मार्ग होता. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने भारतशक्तीला सांगितले की, रशियाने युक्रेनमध्ये इराणी शाहेद ड्रोन वापरून हीच पद्धत अवलंबली आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने हे ड्रोन पाठवल्यामुळे पाश्चात्य देशांच्या हवाई संरक्षणाला हानी पोहोचली होती.

India Pakistan War पाकिस्तानने ड्रोनचा थवा का पाठवला?

तज्ञांचं म्हणणंय की, एकाच वेळी मोठ्या संख्येने ड्रोन एकाच भागात पाठवल्याने अचूक हल्ले होऊ शकत नाहीत, परंतु ते महागड्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांना नुकसान पोहोचवतात. लॉजिस्टिक्समध्ये समस्या निर्माण करतात. पाकिस्तानने ही पद्धत स्वीकारली आहे. पाकिस्तानने जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, भटिंडा, आदमपूर, भुज आणि सर क्रीक यांसारख्या लष्करी तळांवर चीनच्या मदतीने देशांतर्गत उत्पादित आणि तुर्कीकडून मिळवलेल्या ड्रोनचा वापर केला आहे.

पाकिस्तानी ड्रोनच्या ताफ्यात लहान क्वाडकॉप्टर, मोठे यूएव्ही आणि एक मदर ड्रोन होते. मदर ड्रोन इतर ड्रोनना मार्ग दाखवत होती. बहुतेक ड्रोनमध्ये स्फोटके नव्हती, तर फक्त दगडांचे तुकडे किंवा रिकामे कवच होते. यावरून स्पष्ट होते की, ही ड्रोन घुसखोरी कोणताही हल्ला करण्यासाठी नव्हती तर माहिती गोळा करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक तपास करण्यासाठी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला भारताने त्यांची हवाई संरक्षण प्रणाली कार्यान्वित करावी अशी इच्छा होती. त्याला रडारची ठिकाणे, हल्ल्याचे क्षेत्र आणि प्रतिसादाच्या पद्धती जाणून घ्यायच्या होत्या. भविष्यातील हल्ल्यांसाठी डेटा गोळा करण्याची ही एक रणनीती आहे. विशेष म्हणजे हे ड्रोन ऑफ-द-शेल्फ किंवा गॅरेज-मॉडिफाइड होते. त्यांना पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांपेक्षा त्यांची किंमत खूपच कमी होती.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते 10,000 रुपये किमतीच्या ड्रोनचा वापर करून 2 कोटी रुपयांचे प्रतिसाद देत आहेत. यामुळे ते एक प्रकारचे आर्थिक युद्ध देखील बनते. तज्ञांचे म्हणणे आहे की, अशा ड्रोन हल्ल्यांसाठी अधिक दक्षता आवश्यक आहे. त्यांना मारणे आवश्यक आहे, पण त्यांना नष्ट करण्यासाठी खूप महागडी शस्त्रे वापरू नयेत, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img