13.6 C
New York

India-Pakistan War : भारतीय नौदलाकडून मुंबई, कोकण किनारपट्टीवर अलर्ट

Published:

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे. (India-Pakistan War) पण त्यांची गुर्मी मात्र कमी झालेली नाही. ज्यामुळे त्यांनी गुरुवारी (ता. 8 मे) भारतावर ड्रोन हल्ले केले. पण पाकड्यांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यांना भारतीय सैन्याकडून जोरजार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तानचे 50 पेक्षा अधिक ड्रोन भारताने पाडल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता देशात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. भारतीय नौदलाकडून सुद्धा समुद्रात ‘शूट टू किल’चे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमरांनी समुद्रात जाऊ नये, असे आदेश नौदलाने दिले आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नौदलाने मुंबईतील मच्छिमारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत नौदरलाकडून मच्छिमारांना समुद्रातील काही संवेदनशील ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण नौदलाने समुद्रात काही परिसर आखून दिले आहेत, ज्या परिसरात नौदलाव्यतिरिक्त कोणतीही बोट दिसल्यास त्यावर शूट टू किलचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईत ज्यावेळी 26/11 चा हल्ला झाला, तेव्हा आतंदकवादी समुद्रामार्गे मुंबईत आले होते, ज्यामुळे आताही तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे नौदलाकडून हा अलर्ट जारी करम्यात आला आहे.

त्याशिवाय, कोकण किनारपट्टीवर देखील अलर्ट मोड जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात गस्त वाढवण्यात आली आहे. किनारपट्टी भागात रात्री पोलिसांकडून तपासणी करण्यात आली, तर अचानक नाकाबंदी देखील करण्यात आली होती. सिंधुदुर्गात समुद्रकिनाऱ्या लगत 92 लँडिंग पॉइंट असल्याने त्या ठिकाणी पोलिसांची गस्त पाहायला मिळाली. तर रेडी बंदर, विजयदुर्ग बंदर ,मालवण बंदर, देवगड बंदर, निवती बंदर, आचरा बंदर, वेंगुर्ला बंदर, या सर्वच ठिकाणी सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सागरी सुरक्षा सदस्यांना देखील सतर्क राहून संशयित बोटी दिसल्यास पोलिसांना कळविण्याचा आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सागरी सुरक्षेत वाढ केली असून अतिरिक्त पोलीस देखील तैनात करण्यात आले. एखादी अनोळखी इसम किंवा संशयित वस्तू आढळल्यास 112 किंवा सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img