15.2 C
New York

Petrol Diesel Supply : देशभरात मागील 36 तासांपासून पेट्रोल- डिझेल पुरवठा विस्कळीत, कारण काय? जाणून घ्या सविस्तर

Published:

वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या ऑईल कंपनीच्याच्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मागील 36 तासांपासून कंपनीचे पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel Supply) पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहेत. या अडचणीमुळे इंधन पुरवठा करणाऱ्या HPCL च्या देशभरातील सर्व डेपोमधून पेट्रोल पंपला पुरवठ्याचे कामकाज ठप्प झालेले आहे. परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन पुरवठा (Pune)विस्कळीत झाला आहे.

कंपनीचे तांत्रिक तज्ञ सदर प्रणाली पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. त्याचप्रमाणे सदर पुरवठा हा मॅन्युअल मोड मध्ये देखील सुरळित करण्याचे काम सुरू आहे. परंतु, सर्व प्रणाली संलग्न असल्याने त्यात देखील पाहिजे, तशी सुधारणा होत नाहीये. त्यात सुधारणा न झाल्यास सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी अंदाजे आणखी 48 तास लागू शकतात.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी घाबरून जाऊ नये. ही केवळ तांत्रिक अडचण असून, पेट्रोल अथवा डिझेल याची कोणतीही टंचाई नाही. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम यांसारख्या इतर कंपन्यांचे वितरण सुरळीत सुरू असून इंधन सहज उपलब्ध आहे.

तरी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम राखावा, इतर पंपावर गर्दी करू नये. कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई झालेली नाही. केवळ तांत्रिक प्रणाली सदोष झाल्याने अडचण निर्माण झालेली आहे, सर्व परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असं फामपेडाचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी आवाहन केलं आहे.

पुणे पातळीवर, पीडीए पुणे हे एचपीसीएल अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. प्रत्येक तासाला अद्ययावत माहिती घेत आहेत. ही अडचण उद्भवल्यापासून त्यांची आयटी टीम कामावर आहे. आम्हाला आशा आहे की, ही समस्या लवकरच सुटेल आणि आमच्या डिलर्सना त्यांचा पुरवठा वेळेत मिळेल. पुणेकर जनतेला आमची विनंती आहे की घाबरून जाऊ नये, कारण इतर पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कुठल्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही, असं पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी म्हटलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img