पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून ऑपेरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवण्यात आले. या कारवाईअंतर्गत दहशवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. यानंतर पायाखालची जमीन सरकलेल्या पाकिस्तानकडून (Pakistan) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना फोन करून हुजूर अब बख्श दीजिए अशा विनवण्या करण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि आयएसआय प्रमुख असीम मलिक यांच्याकडून या विनवण्या करण्यात आल्या आहेत. असीम मलिक यांनी डोभाल यांच्याकडे आणखी कोणत्या विनंत्या केल्या हे स्पष्ट झालेले नाही.
Operation Sindoor भारताच्या हल्ल्यानंतर आता भीती युद्धाची
या कारवाईपूर्वी, पाकिस्तानी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या लष्कर प्रमुखांना भारत पहलगामचा बदला इतका जोरदार देईल अशी अपेक्षा नव्हती. त्यात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जगासमोर आम्ही फक्त दहशतवादी अड्डेच उद्धवस्थ केले असल्याचे जगाला अधोरेखित केले आहे. भारताने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानी सैन्याला किंवा तेथील नागरी लोकवस्तीला कोणतेही नुकसान पोहोचवले नाही. भारताच्या या हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी दोन्ही देशांमध्ये युद्धाची भीती व्यक्त केली आहे. तर, दुसरीकडे जागतिक समुदायाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Operation Sindoor भारताच्या हल्ल्याला हवे तसे प्रत्त्युत्तर द्या
एकीकडे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि आयएसआय प्रमुख असीम मलिक यांनी ऑपरेशन सिंदूरचा दणका बसल्यानंतर अजित डोभाल (Ajit Doval) यांना फोन करून माफ करण्याची विनवणी केली जात आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पाकिस्तान सैन्याला फ्री हँड देत भारताच्या हल्ल्याला हवे तसे प्रत्युत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच भारताने पाकवर युद्ध लादले असून, त्याला निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल असे शरीफ यांनी म्हटले आहे.