11 C
New York

Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस कारावासाची शिक्षा

Published:

ओतूर,प्रतिनिधी ( रमेश तांबे )

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन, तिला मारहाण करून, तिचा विनयभंग करणाऱ्या (Crime News) आरोपीस खेड न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली.

कृष्णा मारुती उंबरे, वय ३९ वर्षे, राहणार- मांडवे, तालुका – जुन्नर, जि. पुणे असे सश्रम करावासाची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
ओतूर पोलीस स्टेशनमध्ये सन २०१६ मध्ये एका अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन, तिला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याबाबत आरोपी  कृष्णा मारुती उंबरे याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३५४, ३६३,३२३ सह पॉक्सो कायदा कलम ८,१२ अन्वये २०१६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र सदर गुन्ह्याच्या तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना दयाळ यांनी माननीय सत्र न्यायालय, खेड जि.पुणे येथे विहित वेळेत दाखल केले होते.


      सदर केसचा निकाल मा. न्यायाधीश, ए. एस. सय्यद, सत्र न्यायालय, खेड यांनी दि.६ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला असून, नमूद सदर केसमध्ये वर नमूद आरोपी यास भा.द.वि. कलम ३५४ मध्ये दोषी धरून तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास, एक महिना साधी कैद आणि कलम ३६३ मध्ये पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड  व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली असल्याची माहिती श्री थाटे यांनी दिली.


     सदर केसमध्ये सरकारी वकील मिलिंद पांडकर, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक, संतोष घोळवे,ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, खेड सेशन कोर्ट पैरवी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, एस. बी. खरात, कोर्ट पैरवी अंमलदार, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद ढाकणे यांनी कामकाज पाहिले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img