11 C
New York

Diwali Pahat : ओतूर मधील दिवाळी पहाटला रसिक श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.४ नोव्हेबर ( रमेश तांबे )


ओतूर मधील दिवाळी पहाटला रसिक श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवाळी पहाट निमित्त ओतूर ( ता.जुन्नर ) मधील रसिक मंत्रमुग्ध झाले होते,मंजुळ स्वरांनी गायलेली गीतांनी दिवाळी पहाटच्या मंगलमय सुरेल स्वरांनी रसिकांना साद घातली. 

श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था, बॉर्डरलेस पँथर्स परिवार व ग्रिन व्हिजन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रा.शुभांगी डुंबरे व ओतूर भूषण रमेश डुंबरे यांच्या संकल्पनेतून ओतूर नगरीतील दुसरा दिवाळी पहाट संगीत महोत्सव कार्यक्रम दिवाळी पाडवा यशस्वीपणे पार पडला. 

स्वर गंगेच्या काठावरती – पर्व २ “स्वर सावनी”राष्ट्रीय पारितोषिक विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांचा 

मराठी भावगीते व भक्तीगीते मराठी व हिंदी चित्रपटांतील गाण्यांची मैफिल कार्यक्रम रंगला.

पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांनी गायलेली सुरेल सुमधुर आवाजातील मराठी भावगीते व भक्ती गीतांनी ओतूरकर मंत्रमुग्ध झाले.

ओतूर ( ता. जुन्नर ) येथे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवार दि.२ रोजी पहाटे स्व.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे कुस्ती स्टेडियम, कपर्दिकेश्वर मंदिर,ओतूर नगरीमध्ये पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांनी मंजुळ आवाजात गायलेली सुमधूर भावगीते व भक्तीगीते सादर करून ओतूरकर रसिकांचा दिवाळी चा आनंद द्विगुणित केला.ओतूर नगरीत हा दुसरा ऐतिहासिक दिवाळी पहाट संगीत महोत्सव कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, माजी आमदार शरद सोनवणे,श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्मक्ष अनिल तांबे,बॉर्डरलेस पँथर्स परिवाराचे सदस्य रमेश डुंबरे,शुभांगी डुंबरे, श्रीराम एरंडे,उपसरपंच प्रशांत डुंबरे,डॉ.प्रविण डुंबरे,महेंद्र पानसरे,देविदास तांबे,शिरीष ( नंदू ) भोर,जालंदर उकिर्डे, ,महेंद्र ( गांधी ) पानसरे,जितू आण्णा डुंबरे,डॉ.संजय वेताळ,डॉ.राहूल तांबे,डॉ.अमोल डुंबरे,डॉ.अमोल तांबे,अँड.संजय शेटे,संजय नलावडे,संजय गवांदे,पोपट नलावडे,डॉ.अमोल पुंडे,धनंजय कुलवडे,धनंजय डुंबरे,विनायक खोत,सीमा तांबे,अर्चना तांबे,सुरेखा भोर,प्रा.दीपिका जंगम,डॉ.रष्मी घोलप,नितीन पाटील,ग्रीन व्हिजन फाउंडेशन चे संतोष वाळेकर,डॉ.अमित काशिद आदी मान्यवर,श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे सदस्य, बॉर्डरलेस पँथर्स परिवार व ग्रिन व्हिजन फाऊंडेशनचे सदस्य,महिला व ओतूर परिसरातील नागरिक, ग्रामस्थ या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.

डॉ.संपत डुंबरे,डॉ.वैशाली डुंबरे,डॉ.प्राची डुंबरे,प्रसाद डुंबरे यांनी इटली येथे जागतिक विक्रम करून “आयर्न मॅन” किताब मिळवल्याबद्दल त्यांचा आयोजकांच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img