11 C
New York

Manoj Jarange : जरांगे पाटलांचं ठरलं! ‘या’ मतदारसंघात उमेदवार उभे करणार

Published:

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कसून तयारी करत आहे. अंतरवाली सराटीमधून मनोज (Manoj Jarange) यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केलीय. मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. कोणत्या मतदारसंघातून मनोज जरांगे उमेदवारांना उभं (Marathi Candidate) करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर प्रतिक्षा संपली आहे. ज्या मतदारसंघामध्ये उमेदवार द्यायचा नाही, त्या मतदारसंघातील उमेदवार पाडायचा, असा निर्धार जरांगे पाटलांनी केलाय.

बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघामधून लढणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय. आष्टी, गेवराई या मतदारसंघातून लढायचं की नाही, यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली (Maharashtra Assembly Election 2024) आहे. मंठा, परतूर मतदारसंघात उमेदवार देत तेथे देखील जरांगे पाटील लढणार आहेत. जालना जिल्ह्यातील केवळ एकाच जागेवर मनोज जरांगे पाटील लढणार आहेत. याशिवाय संभाजीनगर-फुलंब्री मतदार संघात लढणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. ज्या मतदारसंघामध्ये उमेदवार नाही तिथे उमेदवार पाडणार, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलंय. तसंच ज्या मतदारसंघांमध्ये खुन्नस आहे, तिथेही उमेदवार पाडणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Manoj Jarange जरांगे पाटलांनी काय निर्णय घेतलाय?

मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री मतदारसंघातून लढणार आहेत. कन्नड मतदारसंघातून रिंगणात उतरण्यावर ते विचार करून निर्णय घेणार आहेत. तसंच गंगापूर मतदारसंघात उमेदवार पाडायची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. परभणी जिल्ह्यात पाथरी मतदारसंघ लढवण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीय. हिंगोली मतदारसंघात निवडणूक लढवायची,जरांगे पाटलांनी असा निर्णय घेतलाय. नांदेड जिल्ह्यात हादगाव मतदारसंघ लढवायचा, अशी घोषणा जरांगे पाटलांनी केलीय. हिंगोलीच्या कळमनुरी मतदार संघात उमेदवार पाडणार, तर वसमत मतदार संघात उमेदवार द्यायचा की नाही यावर जरांगे पाटील विचार करणार आहेत.

उर्वरित जागांचा गोंधळ सुरू आहे.जरांगे पाटलांनी बऱ्याच ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या ठिकाणचे स्थानिक नेते मनोज जरांगे पाटील यांना विनंती करत आहे. आता पुढील जागांसाठी मनोज जरांगे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. विधानसभा निवडणुकीत देखील जरांगे फॅक्टरचा फटका बसणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img