19.9 C
New York

Dilip Walse Patil : शेतकरी, युवकांसाठी काम करणार; वळसे पाटलांची मतदारांना ग्वाही

Published:

शेतकरी आणि युवकांसाठी काम करणार असल्याची ग्वाही आंबेगाव- शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. मंचर येथे बुधवारी (ता. 30) दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी, महिला, युवक-युवती व व्यावसायिक मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शेतीला शाश्वत पाणी मिळण्यासाठी, परिसर हिरवागार होण्यासाठी, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी व युवकांना रोजगार मिळण्यासाठी येत्या पाच वर्षांत काम करणार आहे,
यावेळी म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पोपटराव गावडे, देवेंद्र शहा, विवेक वळसे पाटील, बाळासाहेब बेंडे, अॅड. प्रदीप वळसे पाटील, यांच्यासह आदी मान्यवरांनी वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

तांबडेमळा येथे 100 बेड क्षमतेचे सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर महिला रुग्णालयात केले जाईल. दोन स्वतंत्र रुग्णालयांमुळे रुग्णांना पुणे-मुंबईला जाण्याऐवजी येथेच सर्व प्रकारचे उपचार मिळतील असे वळसे पाटलांनी सांगितले. या भागातील जनतेला आरोग्याच्या आधुनिक सुविधा मिळाव्यात म्हणून मंचर उपजिल्हा रुग्णालयात मोफत सिटीस्कॅनसह अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

Dilip Walse Patil 20 वर्षांनंतर प्रत्यक्ष शुभेच्छा

तब्बल 20 वर्षांनंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांना प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य लक्षवेधक ठरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार खासदार यांनी मोबाईलवरून दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img