17.2 C
New York

Assembly Election : भाजपचं मोठा भाऊ; 148 जागा मिळविल्या; मुख्यमंत्री शिंदे जड गेले पण

Published:

महायुतीमध्ये (Mahayuti) जागा वाटपांवरून जोरदार रस्सीखेच दिसून आली. (Assembly Election) भाजपचे (BJP) हायकमांड अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर बैठका होऊन जागा वाटप निश्चित झाले आहेत. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहे. जागा वाटपात महायुतीत भाजपा हाच सर्वात मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. बंडखोरी करणाऱ्या महायुतीतील बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीला तारेवरची कसरत करावी लागत आहेत.

288 महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघासाठी 298 उमेदवारी अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आले आहे . महायुतीतील कोणत्या घटक पक्षांचे उमेदवारी त्यामुळे 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेतले जातील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपने 148 जागा मिळविल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला 85 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस 61 जागा मिळाल्या आहे.

Assembly Election 16 जागा मित्रपक्षाना सोडल्या

भाजप व शिवसेना अशी युती राज्यातील 2019 ला विधानसभा निवडणुकीत होती. भाजपने 164 जागांवर आपले उमेदवार देऊन निवडणूक लढवली होती. मात्र 2024 विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने महायुतीचा धर्म पाळला आहे. मित्र पक्षांसाठी 16 जागा सोडल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 105 उमेदवार निवडून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर लोकसभेला चांगली कामगिरी करणारेआपल्या पत्रात जास्त जागा पाडून घेतल्या आहेत. शिंदे शिवसेनेला 85 जागा मिळाल्या आहेत. 61 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर मित्र पक्षांसाठी चार जागा सोडण्यात आल्या आल्या आहेत.

राज्यातील तब्बल ४७ मतदारसंघांत शिवसेना VS शिवसेना सामना

Assembly Election सेनेत भाजपमधून सर्वाधिक ‘इनकमिंग’

भाजपमधून शिंदे शिवसेनेत सर्वाधिक इनकमिंग झाले आहे. सेनेकेडून कुडाळ मतदार संघातून निलेश राणे यांना, भाजपमधून शिंदे शिवसेनेते जाऊन मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व मधून उमेदवारी मिळाली आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करून कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. भाजप-बोईसर विधानसभा क्षेत्र प्रमुखपदाचे विलास तरे यांनी शिंदे शिवसेनेत दाखल होऊन बोईसर मतदार संघात उमेदवारी मिळाली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजप माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रवेश करून अर्जुनी मोरगाव मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. भाजपे माजी खासदार संजयकाका पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तासगाव कवळमहांकाळ मतदारसंघातून उमेदवारी मिळवली आहे. अजित पवार गटात प्रवेश करून भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा मतदार संघातून उमेदवारी मिळविले आहे. अजित पवारांच्या पक्षात प्रवेश भाजपचे नेते निशिकांत पाटील यांनी करून इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. भाजपाचे सचिन सुधाकर पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करून फलटण कोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. तर भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व राष्ट्रीय प्रवक्ता शायना एनसी यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करून अंधेरी पूर्व मधून शिवसेनेकडून उमेदवारी मिळविली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img