11.5 C
New York

Shivaji Kardile : राहुरीत भाजपकडून शिवाजी कर्डिलेंनी दाखल केला उमेदवारी

Published:

भाजप उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivaji Kardile) यांनी राहुरी (Rahuri) मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव पाटील, बाजीराव गवारे, काशिनाथ लवांडे, बाळकृष्ण बानकर, धनराज गाडे आदी उपस्थित होते. आज शुभ मुहूर्त असल्याने ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला असून सोमवारी किंवा मंगळवारी महायुती घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत पुन्हा अर्ज दाखल केला जाणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी फक्त एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जातेय. दरम्यान काल भाजपकडून (BJP) पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलीय. भाजपची ही यादी जाहीर झाल्यानंतर पक्षाला बंडखोरीचं ग्रहण देखील लागलं होतं. भाजपकडून राहुरी विधानसभा मतदारसंघात (Assembly Election) माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे.

“शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद”; अजितदादांच्या आमदारांचं मोठं विधान”

सध्या राज्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांकडून उमेदवार अर्ज दाखल करत आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये सक्रिय असलेले धनराज गाडे आणि भास्कररा गाडे यांनी भाजपात प्रवेश केल्याने राहुरीत राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलंय.

कर्डिले गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. भाजपने 2019 नंतर पुन्हा शिवाजी कर्डिले यांना तिकीट दिलंय. विरोधामध्ये शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. त्यामुळं राहुरीत पुन्हा कर्डिले आणि तनपुरे यांच्यातच अटीतटीचा सामना होणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये 2019 च्या पराभवाचा वचपा कर्डिले काढणार का? हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img