17.2 C
New York

Accident News : नदीत बुडून आठ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.२३ ऑक्टोबर  ( रमेश तांबे )

मावशी बरोबर नदीवर गेलेल्या चिमूरड्याचा (Accident News) पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ओतूर ( ता.जुन्नर ) येथील मांडवी नदीपात्रात घडल्याने ओतूर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सार्थक गोरख शिंदे वय ८ वर्षे ,रा.ओतूर ता.जुन्नर जि.पुणे असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमूरड्याचे नाव आहे. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे हे अधिक माहिती देताना म्हणाले की, सार्थक शिंदे ची मावशी सानिका अमोल कोकाटे ही मंगळवारी दि.२२ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मांडवी नदीवरील केटी बंधाऱ्या जवळ कपडे धुण्यासाठी गेली होती, त्यावेळेस सार्थक हा मावशी सानिका हिच्याबरोबर नदीपात्राजवळ खेळत होता. सानिका हिचे कपडे धुऊन झाल्यानंतर, सार्थक हा कुठे दिसत नसल्याने तिने शोधाशोध केली, तरी तो कुठे आढळून आला नाही. त्यानंतर सार्थक घरी आलाय का म्हणून,घरी चौकशी केली मात्र सार्थक घरी देखील गेला नव्हता. त्यानंतर सर्वच कुटुंबातील सदस्य त्याची शोधाशोध करू लागले.

मात्र तो इतरत्र कुठेच मिळून आला नाही. बेपत्ता झालेल्या सार्थकचा शोध घेण्यासाठी त्याच्या कुटुंबातील व्यक्ती व ओतूर मधील नागरिक,पोलीसांसह नदीवर शोधाशोध करण्यासाठी गेले असता,सार्थकची चप्पल नदी काठावर त्यांना आढळून आली. त्यामुळे  सार्थक हा नदीच्या प्रवाहात वाहून तर गेला नाही ना ? असा त्यांना संशय आला. सार्थक च्या कुटुंबातील सदस्य ओतूर ग्रामस्थ, नागरिक आणि ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रभर नदीपात्रात शोधाशोध केली,त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नगर -कल्याण महामार्गाच्या पुलाखाली ओतूर येथील मांडवी नदी पात्रात पाण्यात सार्थक चा मृतदेह आढळून आल्याचे श्री थाटे यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img