11.5 C
New York

Anand Pimpalkar : कृष्णशास्त्री पंडित यांच्या दमदार भूमिकेत आनंद पिंपळकर दिसणार

Published:

सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर (Anand Pimpalkar)यांनी आजवर वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ते एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी सज्ज झाले आहेत. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या आगामी मराठी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारणार आहेत. धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपली आहुती दिली त्या अनेक अनामिक व्यक्तींपैकी एक जंजिऱ्याचे हनुमान भक्त व छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक कृष्णशास्त्री पंडित. या कृष्णशास्त्री पंडिताच्या दमदार भूमिकेमध्ये आपल्याला आनंद पिंपळकर दिसणार आहेत. यात अमृता खानविलकर आणि ठाकूर अनुप सिंग यांच्या समवेत अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील प्रस्तुत, तुषार शेलार दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बापरे! 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुले लठ्ठपणाच्या आहारी; जाणून घ्या

आपल्या भूमिकेविषयी बोलताना आनंदजी सांगतात, ‘आजवर बऱ्याच भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील कृष्णशास्त्री पंडित ही भूमिका माझ्यासाठी विशेष आहे. पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव करणाऱ्या या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटातल्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेचा भाग होता आल्याचं खूप समाधान आहे. वेगळेपण व विशेष लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे, प्रेक्षकांना ती नक्की आवडेल अशी आशा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img