11.5 C
New York

India China Lac Issue : सीमावाद संपला? भारतानंतर चीनकडूनही सामंजस्याची भूमिका, नेमकी चर्चा काय?

Published:

भारत-चीन सीमावादाबाबत मोठी माहिती समोर आलीयं. भारतानंतर आता चीननेही (India China Lac Issue) वाद मिटवण्याची भूमिका घेतलीयं. एलएसीवरील गस्ती संपुष्टात आणणार असल्याची चर्चा भारत आणि चीनमध्ये झालीयं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एलएसीवरील गस्तीबाबत समझौता करण्याची घोषणा केली होती. आता भारतानंतर चीननेही लडाखमध्ये सैन्यांच्या गस्ती संपुष्टात आणण्याची सामंजस्याची भूमिका घेतलीयं. चीनी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सकडून यांसदर्भात माहिती देण्यात आलीयं.

भारत-चीन सीमावादार चीनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले, चीन आणि भारताच्या सीमेबाबतच्या मुद्द्यांवरुन चर्चा सुरु आहे. दोन्ही देश चर्चेअंती एका मुद्द्यावर पोहोचले असून या मुद्द्याकडे चीन सकारात्मक पाहत आहे. पुढील चर्चेत चीन भारतासोबत काम करणार असल्याचं जियान यांनी स्पष्ट केलंय. सीमावादाच्या मुद्द्यावरुन दोन्ही देशांनी एलएसीवरील सैन्य हटवण्याबाबत सहमती करण्यात आली असल्याची माहिती भारत विदेश मंत्रालयाकडून 21 ऑक्टोबरला देण्यात आली होती.

मोक्याच्यावेळी अजितदादांना मोठा धक्का; पवारांनी ‘नाना’ म्हणत ‘काटे’ फिरवले

लष्करी अडथळे संपुष्टात आणण्यासाठी भारत-चीन या दोन्ही देशांनी परस्पर कराराची घोषणा केलीयं. अशा परिस्थितीत रशियात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत भारतीय पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या दोन्ही देशांनी अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान रशियाच्या कझान शहरात ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आलीयं. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्सचे मूळ सदस्य आहेत. इराण, इजिप्त, इथियोपिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा 1 जानेवारी 2024 रोजी BRICS मध्ये समावेश करण्यात आला.

मागील अनेक आठवड्यांपासून भारत-चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू होती. पूर्व लडाखमधील सीमावादाच्या मुद्द्यावर भारत आणि चीनमध्ये करार झालायं. LAC वर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झालाय. चीनसोबत अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. पेट्रोलिंगवर सहमती झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी झालायं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img