10.6 C
New York

Maharashtra Elections : आचारसंहितेत प्रशासन अ‍ॅक्टिव्ह; नगर जिल्ह्यातील २५ हजार जाहिराती हटवल्या

Published:

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक (Maharashtra Elections) आयोगाने केली. त्यानंतर राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून या आचारसंहितेचा काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर पहिलीच कारवाई जिल्ह्यातील जाहिरातींच्या फलकांवर केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांमध्ये जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच खासगी मालमत्तेवरील भित्तीपत्रके, घोषणा फलक, रंगविलेल्या जाहिराती, कोनशिला, झेंडे काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसरातील ११ हजार ६४१, सार्वजनिक ठिकाणच्या ९ हजार ५०२ तर खासगी मालमत्तेवरील ३ हजार ८२६ अशा एकूण २४ हजार ९६९ जाहिराती काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात आली. अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८६४, सार्वजनिक ठिकाण ३९१ तर खाजगी मालमत्तेवरील ३२० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.

पुण्यातील ग्रंथालयाला भीषण आग; फर्निचर, लॅपटॉप जळून खाक

संगमनेर मतदारसंघ कार्यालय परिसर ८१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ८८, खासगी मालमत्तेवरील २५५, शिर्डी मतदारसंघ कार्यालय परिसर ९१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ६४१, खासगी मालमत्तेवरील ३५१, कोपरगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ९५४, सार्वजनिक ठिकाण ६१९, खासगी मालमत्तेवरील ३०९, श्रीरामपूर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १३१, सार्वजनिक ठिकाण १ हजार ५५० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.

नेवासा मतदारसंघ कार्यालय परिसर ३२४, सार्वजनिक ठिकाण ५७७, शेवगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ८५४, सार्वजनिक ठिकाण ९३७, खासगी मालमत्तेवरील १ हजार ७२३, राहुरी मतदारसंघ कार्यालय परिसर २५४, सार्वजनिक ठिकाण १४१, खासगी मालमत्तेवरील २१, पारनेर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १२३, सार्वजनिक ठिकाण ९७८, खासगी मालमत्तेवरील ४९५ जाहिराती काढण्यात आल्या आहेत. नगर शहर मतदारसंघ कार्यालय परिसर २८६, सार्वजनिक ठिकाण ४१६, खासगी मालमत्तेवरील ४१, श्रीगोंदा मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार २९४, सार्वजनिक ठिकाण ८०२, खासगी मालमत्तेवरील ३११ तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८२५, सार्वजनिक ठिकाणच्या ३६२ जाहिराती काढण्यात आल्या असल्याचे आचारसंहिता कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img