11.5 C
New York

Maharashtra Vidhan Parishad : मोठी बातमी! अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटला

Published:

गेली तीन-चार वर्षांपासून प्रलंबीत असलेला राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न शिंदे-फडणवीस (Maharashtra Vidhan Parishad) सरकारच्या शेवटच्या वर्षातील अंतिम दिवसांत मार्गी लागला आहे. आज मंगळवार (दि. 15 ऑक्टोबर) रोजी दुपारी यातील 7 आमदारांचा शपथविधी होणार आहे. विधीमंडळात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागली आहे. शासनाकडून अधिकृ राजपत्र जारी करण्यात आलं आहे.

Maharashtra Vidhan Parishad ठाकरे गट न्यायालयात जाणार?

दरम्यान, महायुतीच्या या निर्णयावर शिवसेना उद्धव ठाकरे गट न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं समजतय. 12 पैकी 7 जणांची नाव निश्चित केल्यानंतर ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संबंधित याचिकेचा निर्णय राखीव असताना आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय प्रलंबित असताना त्या विषयावर निर्णय घेणे उचित होणार नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

पक्षाची सूत्रे स्वतःच्याच हाती ठेवण्याचे पवारांचे स्पष्ट संकेत

Maharashtra Vidhan Parishad कोणत्या पक्षात कुणाला संधी?

भाजप – बाबुसिंह महाराज, विक्रांत पाटील, चित्रा वाघ
शिवसेना (शिंदे गट) – हेमंत पाटील, मनिषा कायंदे
राष्ट्रवादी (अजित पवार गट) इदरीस नायकवडी, पंकज भुजबळ

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img