7.2 C
New York

 Maharashtra Assembly Election : उद्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता

Published:

महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्या म्हणजेच मंगळवारी आचारसंहिता लागण्याची दाट (Maharashtra Assembly Election) शक्यता आहे. त्यापूर्वी आज (सोमवार) राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अनेक लक्षवेधी निर्णय होऊ शकतात. विद्यमान राज्य सरकारची ही शेवटची बैठक असेल. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचालींना वेग आला असून, सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. काल रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. आज पुन्हा सकाळीच साडेनऊ वाजता बोलावली मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक महायुती सरकारची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Electionआमदारांपासून मंत्र्याची धावाधाव

लोकप्रिय योजनांचे निर्णय तर होताना पाहायला मिळत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर महायुतीमधील नेत्यांच्या लाभाचे निर्णय ही सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत. नियमना डावलून अनेक निर्णय हे घेतले जात असल्याची टीका विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. शासन निर्णय काढण्याचा धडाका मंत्रीमंडळ बैठकीत तर सुरू आहे. दिवसाला शेकडो शासन निर्णय जारी होताना पाहायला मिळत आहेत. त्यासाठी आमदारांपासून मंत्र्याची चांगलीच धावाधाव सुरु झालीय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img