9.9 C
New York

Ajit Pawar : महायुतीत अजितदादा नाराज ?

Published:

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. (Ajit Pawar) यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच आता महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. अलिबाग- विरार कॉरिडोअर प्रकल्पाला अजित पवारांनी मंजुरी नाकारल्याने हा वाद झाल्याचे बोललं जात आहे.

अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज असल्याची माहिती समोर आले आहे. सरकारमधील अनेक मंत्री अर्थखात्याच्या विरोधानंतरही कॅबिनेट बैठकीच्यापूर्वी शेवटच्या क्षणाला महत्त्वाच्या योजनांचे प्रस्ताव मांडत असल्यामुळे अजित पवार नाखूश आहेत.मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अवघ्या 10 मिनिटांत त्यामुळेच अजित पवार हे गुरुवारी झालेल्या निघून गेल्याचे सांगितले जाते. पुढे ही बैठक तब्बल दोन ते अडीच तास चालली. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यात आ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात हा मोठा वाद झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या अलिबाग-विरार प्रकल्पाला मंजुरी देण्यास अजित पवारांनी परवानगी नाकारली. मात्र या प्रकल्पाला अजित पवारांनी परवानगी का नाकारली? यावरुन त्या दोघांमध्ये वाद विकोपाला गेला.

Ajit Pawar अजित पवारांचं स्पष्टीकरण

या सगळ्या उलटसुलट चर्चांनंतर अजित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मी काल कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता. त्यासाठी नांदेड विमानतळ येथे जायचे होते, कॅबिनेट 11 वाजता होती. ही बैठक नियोजित वेळेपेक्षा उशीरा सुरु झाली. महत्वाच्या विषयांची चर्चा कॅबिनेटमध्ये झाल्यानंरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून मी नियोजित लातूर उदगीर येथे कार्यक्रम यासाठी निघालो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img