21.5 C
New York

Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Published:

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज, बुधवारी (09 ऑक्टोबर) त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Renowned industrialist Ratan Tata passed away)

रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा यांचं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

Ratan Tata रतन टाटा यांची कारकिर्द

दरम्यान, वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजेच 1991 मध्ये रतन टाटा यांना ऑटोमोबाईल क्षेत्रापासून स्टीलपर्यंत विविध क्षेत्रात विस्तारलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात टाटा ग्रुपने एक नवीन उंची गाठली. 2012 पर्यंत त्यांनी हे अध्यक्षपद भूषवले. 1996 मध्ये टाटा यांनी टाटा टेलिसर्व्हिसेस या टेलिकॉम कंपनीची स्थापना केली. तर 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मार्केटमध्ये आणण्यात आले. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने 2008 मध्ये रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img