11.5 C
New York

Crime News : नवी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला 4 लाखांची लाच घेताना अटक

Published:

नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना (Crime News) चार लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या घटनेने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. बेलापूर शाहबाज येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी आरोपीच्या सुटकेसाठी लाच मागण्याचे हे प्रकरण होते. यापूर्वीच 14 लाख रुपयांची लाच सतीश कदम यांनी घेतली होती. आता त्यांनी पुन्हा 12 लाखांची लाखांची लाच मागितली होती. मंगळवारी त्यात 5 लाखांची तडजोड झाली आणि 4 लाख रुपये घेताना अटक करण्यात आली.

यंदा 27 जुलै रोजी बेलापूरच्या सेक्टर 19 मधील शाहबाज गावात चार मजली इमारत कोसळली होती. यात तिघांचा बळी गेला होता. एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमारत दुर्घटना प्रकरणात दोन बिल्डरांसह एका गुंतवणूकदारावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

संपूर्ण जिल्हाच ‘अहिल्यानगर’; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

इमारत दुर्घटनेतील गुंतवणूकदार महेश कुंभार यांना विविध गुन्ह्यात अडकवून त्यांच्यावर गंभीर कलमे लावण्याची धमकी देत तब्बल 14 लाख रुपये त्यांच्या कुटुंबीयांकडून सतीश कदम यांनी उकळले होते. कदम वारंवार पैसे मागत असल्याने अजय कुंभार यांनी पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे 12 लाखांची तडजोड 4 लाखांवर झाली. ही रक्कम घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना त्यांच्याच घरी रंगेहाथ पकडण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img