19.9 C
New York

 Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले महायुतीच्या जागा वाटपाचे गणित

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजूनही निश्चित झालेले नाही. दुसरीकडे मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मनौधर्य उंचावले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांना महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. आमचा ८० टक्के पेपर सोडवला आहे. २० टक्के पेपरही लवकरच सोडवणार आहोत. त्याची माहिती तो सोडवला गेला की तुम्हाला देण्यात येईल.

 Devendra Fadnavis काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

काल निवडणूक निकालामुळे भाजपला घेण्याची संधी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा पाहत होते. भाजपचा पराभव हरियाणात झाल्यावर शस्त्र चालवण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली होती. परंतु त्यांना ती संधी मिळाली नाही. आता देशाचा मूड काय आहे, ते त्यांना लक्षात आले आहे. आम्ही एकत्रित असणारे त्यामुळे कालपर्यंत ही तिन्ही पक्ष ”हम आपके हैं कौन” म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार केला होता. हा फेक नॅरेटिव्ह ब्रेक आता विधानसभा निवडणुकीत झाला आहे. पूर्णपणे फेक नॅरेटीव्ह संपला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

आमचे सरकार असताना राज्यात आठ मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यातील पाच मेडीकल कॉलेज विदर्भातील आहेत. त्या सर्व पाचही मेडीकल कॉलेजचे भूमीपूजन आज होत आहेत. यामुळे महाराष्ट्रात वैद्यकीय जागा वाढणार आहेत. त्याचा फायदा राज्याला होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

 Devendra Fadnavis नागपूरसाठी १३ हजार कोटींची

नागपूर विमानतळाचे आज भूमीपूजन होत आहे. नागपूरला देशातील आधुनिक विमानतळ होत आहे. त्यात कॉगो आणि प्रवाशी विमानतळ होत आहे. १३ हजार कोटींची कामे नागपूरसाठी करत आहोत. ५२ हॉस्टेलचे उद्घघाटन ओबीसीसाठी एकाच दिवशी करत आहोत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img