17.2 C
New York

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली

Published:

इंदापूरच्या राजकाराणाचा वनवास संपला असं म्हणत ज्यांनी भाजपला राम-राम केला, ते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. इंदापुरात धुमधडाक्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याला शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. हर्षवर्धन पाटील यांची इंदापुरात मोठी ताकद आहेत. त्यांनी अचानक साथ सोडल्याने भाजपला मोठं खिंडार पडले आहे.

आज इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह अनेक नेते उपस्थित आहेत. आज हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना चांगलाच दणका बसणार आहे. ”गेल्या २ महिन्यांपासून मी इंदापुरात फिरतोय. लोकांशी बोलतोय. तुम्ही विधानसभा लढायला हवी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांची भावना मी भाजपमधील नेत्यांपर्यंत पोहोचवली,’ असं म्हणत हर्षवर्धव पाटील यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असल्यांचं त्यांनी सांगितलं.

Harshvardhan Patil पाटलांच्या प्रवेशामुळे प्रवीण माने ॲक्शन मोडवर

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व राज्यातील सर्वात मोठा दूध प्रक्रियेचा ब्रँड असलेल्या सोनाईचे संचालक प्रवीण माने ॲक्शन मोडवर आले आहेत. दोन दिवसात कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. इंदापूर विधानसभा उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करू, असं त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांशी बोलून मेळावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img