21.7 C
New York

Board Exam : परीक्षेतील कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी CBSE बोर्डाचे मोठे पाऊल

Published:

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आता इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी मोठे पाऊल टाकलं आहे. आता परीक्षा केंद्रावर CBSE परीक्षेच्या धरतीवर राज्यात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या या धोरणामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनंतर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला ही सुरुवात होणार आहे. विद्यार्थी सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Board Exam आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अनेक वेळा सीसीटीव्ही बसवा आणि त्याचे स्टोरेज करण्याची चांगली क्षमता असावी अशा सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वारंवार देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कॉपी करणारे विद्यार्थी, त्यांना मदत करणारे नातेवाईक आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीचा जालीम उपाय करण्यात आला आहे.

Board Exam तर परीक्षा केंद्रच रद्द

मात्र, आजही अनेक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले नाही. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आता सीबीएसई बोर्डाच्या धरतीवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसतील, त्यांचे परीक्षा केंद्रच रद्द होणार आहे. परीक्षा केंद्र कायम ठेवायचे असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवाळीनंतर परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला सुरुवात होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img