19.1 C
New York

Weather Update : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पाहा आज कुठे बरसणार

Published:

सध्या राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. (Weather Update) अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. शेती पिकांना मोठा फटका या पावसामुळे बसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आणखी किती दिवस या पावसाचा जोर कायम राहणार ? याकडे सर्वांचेंच लक्ष लागले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणवगळता उर्वरित भागात पाऊस थांबणार असून विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. यलो अलर्ट जारी तसेच आज विदर्भात करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत आज (रविवार) कमाल आणि किमान तापमान हे 31 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुबंई परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आज कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची ‘वर्षा’वर खलबत

समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचीवर वारे वाहत आहेत. अग्नेय अरबी समुद्रापासून वायव्य बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान कमी होताच कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे पाऊस आज राज्यातील बहुतांश ठिकाणी विश्रांती घेणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत ढगाळ वातावरण असेल. तसेच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img