रविचंद्रन अश्विनने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी (Cricket News) सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. फलंदाजीत शतक केले नंतर गोलंदाजीतही कमाल केली. दुसऱ्या डावात बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार (Bangladesh) पाडत सहा विकेट्स घेतल्या. या सामन्यात अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या बरोबरच अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला. आश्विनने याबाबतीत सचिन तेंडुलकरला सुद्धा (Sachin Tendulkar) मागे टाकलं आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावण्यात अजूनही सचिनच अव्वल आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तीन भारतीय आहेत. दुसऱ्या क्रमांकावर धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आहे. रोहित शर्मा दहाव्या (Rohit Sharma) क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकीर्दीत 200 टेस्ट, 463 एकदिवसीय आणि एक टी 20 सामना खेळला आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 329 डावात 53.78 सरासरीने 15,921 रन केले. यामध्ये 51 शतके आणि 68 अर्धशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा नाबाद 248 हा सर्वोच्च स्कोअर आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 18,426 धावा केल्या आहेत. यामध्ये 49 शतक आणि 96 अर्धशतक आहेत. सचिनचा वनडे क्रिकेटमधील 200 नाबाद हा सर्वोच्च स्कोअर आहे. सचिनने त्याच्या कारकीर्दीत फक्त एकच टी 20 सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 10 धावा केल्या होत्या.
Cricket News विराट कोहलीचे क्रिकेट रेकॉर्ड
विराट कोहलीने आतापर्यंत 114 टेस्ट, 295 वनडे आणि 125 टी 20 सामने खेळले आहेत. विराटने कसोटीतील 193 डावात 8,871 धावा केल्या आहेत. यामध्ये 29 शतक आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये 283 डावांत विराटने 13,906 धावा केल्या आहेत. यामध्ये 50 शतक आणि 72 अर्धशतकाकांचा समावेश आहे. वनडे मध्ये 183 धावा हा त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोअर आहे. विराटने 117 टी 20 डावांत 4,188 धावा केल्या आहेत.
Cricket News रोहितची क्रिकेट कारकीर्द
रोहितने आतापर्यंत 60 टेस्ट, 265 वनडे आणि 159 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 103 डावांत त्याने 4,148 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 212 धावा हा त्याचा सर्वोत्कष्ट स्कोअर आहे. वनडे क्रिकेटमध्ये 257 डावांत रोहितने 10,866 धावा केल्या आहेत. यामध्ये 31 शतके आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे. 264 धावा हा त्याचा वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्कोअर आहे. रोहितने 151 टी 20 डावांत एकूण 4,231 धावा केल्या आहेत.
Cricket News सामनावीराचा पुरस्कार पटकावणारे 10 टॉप खेळाडू
सचिन तेंडुलकर
एकूण सामने : 664
सामनावीर पुरस्कार : 76
विराट कोहली
एकूण सामने : 534
सामनावीर पुरस्कार : 67
सनथ जयसूर्या
एकूण सामने : 586
सामनावीर पुरस्कार : 58
जॅक्स कॅलिस
एकूण सामने : 519
सामनावीर पुरस्कार : 57
कुमार संगकारा
एकूण सामने : 594
सामनावीर पुरस्कार : 50
रिकी पाँटिंग
एकूण सामने : 560
सामनावीर पुरस्कार : 49
शाकिब अल हसन
एकूण सामने : 446
सामनावीर पुरस्कार : 45
शाहिद अफरीदी
एकूण सामने : 524
सामनावीर पुरस्कार : 43
ब्रायन लारा
एकूण सामने : 430
सामनावीर पुरस्कार : 42
रोहित शर्मा
एकूण सामने : 484
सामनावीर पुरस्कार : 42